Type Here to Get Search Results !

गॅस सिलेंडरच्या स्फोटात २ वर्षीय चिमुकलीचा मृत्यू!



अमरावती: अमरावतीमधील यात्रेतील फुगेवाल्याकडून गॅसचा फुगा घेत असताना गॅस सिलेंडरचा अचानक स्फोट झाला, यात चिमुकलीचा पाय हा शरीरापासून वेगळा झाला आहे. या भीषण दुर्घटनेत परी नावाच्या चिमुकलीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. 



याबद्दल अधिक महिती अशी कि, अचलपूर तालुक्यातील शिंदी बुद्रुक येथील ताना पोळ्याच्या यात्रेत परी सागर रोही ही २ वर्षीय चिमुकली आपल्या आजोबांसह गेली होती. यात्रेत गॅसचे फुगे दिसल्याने तिने गॅसचा फुगा घेऊन देण्याचा हट्ट आपल्या आजोबांकडे केला. रंगीबेरंगी फुगे पाहून चिमुकली परी आपल्या आजोबांसोबत फुगे विक्रेत्याजवळ पोहचली. यावेळी फुगे पाहत असताना अचानक फुगेवाल्याजवळ असणाऱ्या गॅस सिलेंडरचा स्फोट झाला. या भीषण स्फोटात दोन वर्षीय परीचा एक पाय शरीरापासून वेगळा झाला आणि ती गंभीर जखमी झाली.



दरम्यान,  चिमुकलीला तात्काळ उपचारांसाठी अचलपूर रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र या दोन वर्षीय परीचा उपचारादरम्यान दुर्देवी मृत्यू झाला आहे. 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies