Type Here to Get Search Results !

“मराठा समाजाचे तडफदार नेतृत्व महाराष्ट्राने गमावले”: विनायक मेटेंच्या निधनावर “यांनी” केले दु:ख व्यक्त!



मुंबई: शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांचे 52 व्या वर्षी अपघाती निधन झाले आहे. मुंबई-पुणे एक्सप्रेसवर हा अपघात झाला असून पहाटे 5:30 वाजता भातान बोगद्याजवळ ही घटना घडली. दरम्यान, मेटेंच्या निधनानंतर राजकीय वर्तुळातून शोक व्यक्त केला जात आहे. राज्याचे माजी गृहमंत्री तथा राष्ट्रवादीचे आमदार दिलीप वळसे-पाटील यांनी विनायक मेटेंच्या निधनावर दुःख व्यक्त केले आहे. 



दिलीप वळसे पाटील हे ट्विट करत म्हणाले कि,  शिवसंग्राम पक्षाचे अध्यक्ष, माजी आमदार विनायक मेटे यांचे अपघाती निधन धक्कादायक व दुःखद आहे. बीड जिल्ह्यातून राजकीय पार्श्वभूमी नसताना मेटे यांनी विविध आंदोलनातून आपले नेतृत्व सिद्ध केले. “मराठा समाजाच्या मागण्यांसाठी नेहमीच आग्रही असणारे एक तडफदार नेतृत्व महाराष्ट्राने गमावले.” मेटे यांच्या कुटुंबीयांना या धक्क्यातून सावरण्याचे बळ मिळो ही प्रार्थना असे म्हणत त्यांनी विनायक मेटे यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies