Type Here to Get Search Results !

“...म्हणून शिंदे गटात जाण्याचा निर्णय योग्यच होता”: ‘यांनी’ केले स्पष्टच!



मुंबई - शिवसेनेचे उपनेते आदेश बांदेकर आणि शरद पोंक्षे यांच्यात कलगीतुरा पाहायला मिळाला. आता, पुन्हा एकदा शरद पोंक्षेंनी ट्विट करुन अप्रत्यक्षपणे शिवसेनेवर निशाणा साधला आहे.



पोंक्षे यांनी आपल्या ट्विटमध्ये कुठेही शिवसेनेचं नाव घेतलं नाही. मात्र, शिवसेना-संभाजी ब्रिगेडच्या युतीचं टायमिंग साधत टिकात्मक ट्विट केले. आजचा निर्णय बघून मा.शिंदेसाहेबांसोबत जाण्याचा निर्णय किती योग्य होता.ह्याचा आनंद होत आहे. विनाशकाले विपरीतबुद्धी... असे ट्विट करत पोंक्षे यांनी शिवसेनेवर निशाणा साधला. तसेच, ही युती त्यांना अजिबात रुचली नसल्याचेही दिसून येत आहे.



दरम्यान, एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेच्या काही आमदारांनी बंड केल्यानंतर आता शिवसेना आणि संभाजी ब्रिगेडनं युती करण्याचा निर्णय घेतला आहे. 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies