Type Here to Get Search Results !

प्रेयसीसोबत हॉटेलमध्ये गेलेल्या प्रियकराने केले धक्कादायक कृत्य!



गोंदिया: जिल्ह्यात प्रेयसीसोबत हॉटेलमध्ये गेलेल्या एका प्रियकराने विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. सदरील प्रकार हा शहरातील एव्हरग्रीन हॉटेलमध्ये घडला.शतक जांगडे (वय 23 रा. आंबाटोली फुलचुर) असे विष प्राशन केलेल्या तरुणाचे नाव आहे.



याबद्दल अधिक माहिती अशी कि, शतक हा त्याच्या प्रेयसीसोबत शहरातील एव्हरग्रीन हॉटेलमध्ये गेला. दोघांनी रूमही बुक केली. मात्र, हॉटेलच्या रूममध्ये त्याचे प्रेयसीसोबत काही कारणावरून वाद झाले.दोघांमधील वाद हा इतका वाढत गेल्याने शतक याने सोबत आणलेले विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. 



दरम्यान,  जेव्हा हा सर्व प्रकार हॉटेलच्या इतर कर्मचाऱ्यांच्या लक्षात येताच, त्यांनी तातडीने शतक याला रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. सध्या त्याच्यावर उपचार सुरू आहेत. 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies