Type Here to Get Search Results !

केदार दिघेंना मुंबई पोलिसांचे समन्स! जाणून घ्या काय आहे प्रकरण!



मुंबई:  आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे यांना शिंदेंचा गड मानल्या जाणाऱ्या ठाण्याचे शिवसेना जिल्हाप्रमुख बनवले. आता केदार दिघे यांना एक धक्का बसला आहे. त्यांच्या विरोधात बलात्कार पीडित तरूणीला धमकावल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी मुंबईपोलिसांनी केदार दिघेंना समन्स पाठवले आहे. तसेच मुख्य आरोपी रोहित कपूर याच्यावर अटकेची टांगती तलवार आहे. 



याबद्दल अधिक माहिती अशी कि, एका बलात्कार पीडित तरुणीला जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी शिवसेनेचे ठाणे जिल्हा प्रमुख केदार दिघे यांच्या विरोधात ना. म. जोशी मार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच रोहित कपूर याच्यावर बलात्काराचा गुन्हा ना. म. जोशी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. लोअर परळ मधील सेंट रेगीज या पंचतारांकीत हॉटेलमध्ये तरूणीवर बलात्कार करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर पीडित तरूणीने तक्रार करु नये म्हणून केदार दिघे यांनी तिला धमकावल्याचा आरोप केला आहे. पीडित तरुणीच्या तक्रारीवरून ना. म. जोशी मार्ग पोलिसांनी तरूणीवर बलात्कार करणारा रोहित कपूर आणि तिला धमकावणारा म्हणून केदार दिघे या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


दरम्यान, याप्रकरणी मुंबई पोलिसांनी केदार दिघेंना समन्स पाठवले आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies