Type Here to Get Search Results !

काँग्रेस खासदार राहुल गांधी, प्रियांकांना पोलिसांनी घेतले ताब्यात!



नवी दिल्ली: महागाई आणि बेरोजगारीविरोधात काँग्रेसने महाराष्ट्रासह नवी दिल्लीत आंदोलने केली. नवी दिल्लीत काँग्रेसने संसद भवनापासून राष्ट्रपती भवनापर्यंत मोर्चा काढला. नवी दिल्लीतील काँग्रेसच्या आंदोलनात राहुल गांधी हे देखील सहभागी झाले होते. 



पक्षाच्या सर्व नेत्यांनी काळे कपडे परिधान करून केंद्रातील मोदी सरकारविरोधात आंदोलन केले. त्याचवेळी विनापरवानगी आंदोलन केल्याच्या आरोपांखाली दिल्ली पोलिसांनी काँग्रेस खासदार राहुल गांधी, प्रियांका गांधी वाड्रा यांच्यासह अनेक दिग्गज काँग्रेस नेत्यांना ताब्यात घेतले.



मुंबईसह महाराष्ट्रातही महागाई आणि बेरोजगारीच्या मुद्द्यावर काँग्रेसने आक्रमक पवित्रा घेतला आहे. मुंबई आणि राज्यातील विविध भागात काँग्रेस नेत्यांनी आंदोलने केली. मुंबईत पोलिसांनी नाना पटोले, बाळासाहेब थोरात, भाई जगताप यांच्यासह अनेक नेत्यांना ताब्यात घेतले.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies