Type Here to Get Search Results !

मेंदूज्वर आजाराने ७ वर्षीय बालिकेचा मृत्यू!



भंडारा: भंडारा जिल्ह्याच्या लाखनी तालुक्यातील लाखोरी येथे मेंदूज्वर आजाराने ७ वर्षीय बलिकेचा मृत्यू झाला. नुवांशी विलास उरकुडे असे मृतक बलिकेचे नाव आहे. 



प्राप्त माहितीनुसार, नुवांशी हिला ४ ते ५ दिवसांपासून ताप आलेला होता, तिच्यावर गावीच आरोग्य उपकेंद्रात उपचार करण्यात आले, मात्र ताप कमी होत नसल्याने तिला डॉक्टरांनी तपासून नागपूर येथे हलविण्यास सांगितले. उपचारादरम्यान नागपूर येथील धंतोली येथील खाजगी रुग्णालयात नुवांशी हिचा मृत्यू झाला.  



दरम्यान, मेंदूज्वर हे एक गंभीर इन्फेक्शन आहे, ज्याचा मेंदू आणि पाठीच्या कण्याभोवतीच्या संरक्षक थरावर परिणाम होतो. हा आजार बॅक्टेरिया, व्हायरस आणि बुरशीमुळे होतो. मेनिंगोकोकल मेनिंजायटिस (मेंदूज्वर) नायसेरिया मेनिंगिटायडिस बॅक्टेरियामुळे होतो, ज्यामुळे आजाराची तीव्रता मोठ्या प्रमाणात वाढते. हा आजार श्वसनाद्वारे एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे संक्रमित होऊ शकतो.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies