Type Here to Get Search Results !

तृतीयपंथीवर तिघांनी मिळून केला बलात्कार!



जालना - एका ३० वर्षीय तृतीयपंथीवर बलात्कार केल्याची घटना शहराजवळील मंठा बायपास रोडवरील रेल्वे उड्डाणपुलाखाली घडली आहे. 



याबद्दल अधिक माहिती अशी कि, संशयित तृतीयपंथी ही शुक्रवारी सकाळी पीडितेकडे आली. तुमच्या शिष्यला काही लोकांनी मंठा बायपासवरील उड्डाणपुलाखाली पकडून ठेवले आहे. तुम्ही गुरूला बोलावून आण, तेव्हा मी तुझ्या शिष्याला सोडते, असे ते म्हणत असल्याचे सांगत आरोपी पीडितेला स्कुटीवर बसून उड्डाणपुलाखाली घेऊन गेली. तेथे संशयित आसेफ शेख व फाद शेख हे दोघे बसले होते. त्यावेळी तृतीयपंथी व्यक्तीने पीडितेला दोन्ही आरोपींच्या अंगावर लोटले. त्यानंतर आरोपींनी पीडितेवर बलात्कार केला. त्यानंतर तिघे त्या ठिकाणाहून पळून गेले.



दरम्यान,  या प्रकरणी पीडित तृतीयपंथ्याच्या तक्रारी वरून कदीम जालना पोलीस ठाण्यात तिघा जाणा विरुद्ध बलात्कार केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे .दोन आरोपीना पोलीसांनी दोन तासात अटक केली असून एक आरोपी फरार असल्याने पोलिसांनी शोध सुरू आहे


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies