Type Here to Get Search Results !

आजचे राशीभविष्य, सोमवार १५ ऑगस्ट २०२२; जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस!



मेष:

नवीन ओळखी लाभदायक ठरतील. जवळच्या ठिकाणी फिरायला जाल. किरकोळ जखमांकडे दुर्लक्ष करू नये. हातातील कलेला वेळ द्याल.  रागावर नियंत्रण ठेवणे हिताचे ठरेल. 



वृषभ:

अधिकार्यांयच्या रोषाला बळी पडू नका. उधारीचे व्यवहार नकोत. नवीन योजनांवर काम कराल. मुलांच्या सहवासातून आनंद मिळेल. दिनक्रम व्यस्त राहील. 



मिथुन:

समोरील गोष्टीचा आनंद घ्याल. करमणुकीत वेळ घालवाल. नोकरदार वर्गाच्या समस्यांचे निराकरण होईल. मित्रांशी वादाचे प्रसंग येऊ शकतात. कष्टाला पर्याय नाही. 



कर्क:

सामाजिक हितसंबंध सुधारतील. केवळ आपल्या कामावर लक्ष केंद्रीत करा.  महत्त्वाचे निर्णय घेताना अडचण येऊ शकते. ध्यानधारणा करावी. दिवसभर आत्ममग्न राहाल. 



सिंह:

आपल्या भावना उत्कृष्ट पद्धतीने मांडाल. हितशत्रूंचा त्रास संभवतो. अनावश्यक चिंता करत बसू नका. जबाबदार्याा वाढतील. शब्द देताना शहानिशा करा.



कन्या:

दिवसाच्या पूर्वार्धात चांगली कामे करावीत. पती पत्नीमध्ये गैरसमजाचे वारे वाहू शकतात. कौटुंबिक वातावरण खेळते राहील. वेळेचे महत्त्व ध्यानात घ्या. परिस्थितीनुरूप बदलावे लागेल. 



तूळ:

अति उत्साह दाखवायला जाऊ नका. अडचणीवर खंबीरपणे मात कराल. नातेवाईकांचे प्रश्न सोडवावे लागतील. दिवस मनाजोगा घालवाल. जोडीदाराची बाजू वरचढ ठरू शकते. 



वृश्चिक:

हातातील कामात यश येईल. मानसिक चंचलता जाणवेल. विरोधकांचा त्रास कमी होईल. नसती काळजी करू नका. पराक्रमाला वाव आहे. 



धनू:

जोडीदार तुमची इच्छा पूर्ण करेल. प्रसंग ओळखून सामाजिक कार्य करा. दैनंदिन कामात चाल ढकल करू नका.  मुलांचे वागणे स्वतंत्र वृत्तीचे वाटेल. अंगमेहनतीची कामे कराल. 



मकर:

कौटुंबिक अडचणीतून मार्ग काढाल. उगाच रागराग करू नका. कामाचा उरक वाढेल. वाणीवर ताबा ठेवणे हिताचे ठरेल. वरिष्ठांना नाराज करून चालणार नाही. 



कुंभ:

जोडीदाराच्या प्राप्तीत वाढ होईल. खेळीमेळीतून सत्कार्य कराल. व्यवहारकुशलता दाखवावी. कामाचा जोम वाढेल. समोरील संधी ओळखायला शिका. 



मीन:

अचानक धनलाभाचा योग. पथ्यपाणी चुकवू नये.  कोणत्याही गोष्टीचा अतिरेक करू नका. प्रकृतीत सुधारणा होईल. कौटुंबिक वातावरण स्थिर ठेवावे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies