Type Here to Get Search Results !

आजचे राशीभविष्य, शनिवार १३ ऑगस्ट २०२२; जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस!

 


मेष:

भौतिक सुखाला फार महत्त्व राहणार नाही.  मानसिक दडपण कमी होईल. मान-सन्मानात वाढ होईल. जोडीदाराचा वरचष्मा राहील. काही तडजोडी कराव्या लागतील. 



वृषभ:

बदलाच्या योजना अनुकूल ठरतील. जुनी कामे पूर्ण कराल. कौटुंबिक गैरसमज मनातून काढून टाकावेत. कौटुंबिक खर्चाला आवर घालावी लागेल. मानसिक स्थैर्य लाभेल.


 

मिथुन:

मनाचा गोंधळ उडवून घेऊ नका. समोरील प्रत्येक गोष्टीचा आनंद घ्याल. वरिष्ठांच्या होकारत होकार मिसळावा लागेल. योजनाबद्ध कामे करावीत. घरातील प्रलंबित कामे उरकाल. 



कर्क:

भावंडांकडून चांगल्या बातम्या मिळतील. जवळच्या व्यक्ति भेटतील. सहकारी तुम्हाला चांगली मदत करतील. जवळच फेरफटका मारायला जाता येईल. जबाबदारीची जाणीव ठेवून वागावे. 



सिंह :

सामाजिक प्रतिष्ठा जपावी. धाडस व पराक्रमात वाढ होईल. आवडी बाबत दक्ष राहाल. मनातील वाईट गोष्टींचा निचरा करा. सकारात्मक दृष्टीकोन बाळगावा. 



कन्या:

मानापमानाच्या प्रसंगांकडे दुर्लक्ष करावे. इतर कोणाकडून मदतीची फार अपेक्षा करू नका. मानसिक अवस्था संतुलित ठेवा. कले संदर्भात नवीन वाट चोखाळाल. आवडत्या कामांमध्ये वेळ घालवा. 



तूळ:

मित्रांशी सलोख्याने वागावे.  पूर्वी केलेली बचत मोलाची ठरेल. मनाची चंचलता जाणवेल. अधिकारी वर्ग तुमच्यावर खुश राहील. विशाल दृष्टीकोन बाळगावा. 



वृश्चिक:

आर्थिक आघाडीवर दिवस चांगला जाईल. प्रतिष्ठित लोकांशी ओळख वाढेल. मानसिक शांतता लाभेल. कामाला नवीन चालना मिळेल. अति उत्साह दाखवायला जाऊ नका. 



धनू:

कुटुंबातील सदस्यांशी सलोखा ठेवावा. नवीन संधीकडे लक्ष ठेवावे. कौटुंबिक काळजी सतावत राहील. कामात चिकाटी ठेवावी लागेल. एखादी नवीन गोष्ट हाती लागू शकते. 



मकर:

सहकारी वर्गाकडून मदतीची अपेक्षा बाळगू नका. मनातील संभ्रम काढून टाकावेत. एकावेळी अनेक कामे अंगावर घेऊ नका. स्थावर विषयक कामे निघतील. हाताखालील लोक चांगले मिळतील.


 

कुंभ: 

मुलांच्या वागण्याकडे लक्ष ठेवा. कामे योग्य पद्धतीने मार्गी लागतील. वाहन चालवताना सावधानता बाळगावी.  कामातून समाधान लाभेल. तुमचा उत्साह वाढीस लागेल. 



मीन:

कुटुंबियांसोबत वेळ घालवावा, त्यातून मानसिक समाधान लाभेल. भागीदारीच्या कामातून चांगला लाभ होईल.  शांत राहून परिस्थितीचा आढावा घ्यावा. बुद्धी चातुर्यावर कामे पार पाडाल. 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies