Type Here to Get Search Results !

भिवघाट-पळशी रोडवर अपघातात एकाचा जागेवरच मृत्यूभिवघाट : खानापूर तालुक्यातील भिवघाट-पळशी रोडवर झालेल्या अपघातात एकाला आपला जीव गमवावा लागल्याने परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.


याबबत अधिक माहिती अशी की, मालवाहू ट्रक (के.ए.२३-ए-) हा नागज येथून माल घेवून भिवघाटकडे निघाला होता. सदरचा मालवाहतूक ट्रक हा हसबे पेट्रोल पंपाच्या समोर थांबून ट्रक चालक हा रस्ता विचारण्यासाठी पेट्रोल पंपावर गेला होता.


वाचा सविस्तर : शिंदे सरकारचा खाते वाटपाचा मुहूर्त ठरला I वाचा कोणाला कोणते खाते मिळणार !


यावेळी पळशी येथील  नवनाथ पाटील पळशीहून विट्याकडे निघाला होता. परंतु रस्त्याच्या कडे उभा राहिलेल्या मालवाहतूक ट्रकला नवनाथ पाटील यांच्या दुचाकीने धडक दिली. या झालेल्या अपघातामध्ये नवनाथ पाटील यांचा जागेवरच मृत्यू झाला. याबाबत खानापूर पोलिसांनी घटनास्थळी भेट देत सदर घटनेचा पंचनामा केला आहे. 

🪀 WhatsApp वर न्यूज/जॉब्स/माहिती-मनोरंजन 'माणदेश एक्सप्रेस' Free जॉईन करा, त्यासाठी क्लिक करा 


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies