Type Here to Get Search Results !

सावधान! टॅटू काढल्याने १२ जणांना झाली HIV ची लागण!



वाराणसी : टॅटू काढल्याने वाराणसीतील १२ जणांना HIV ची लागण झाली आहे. एचआयव्ही झालेल्या व्यक्तीमध्ये १० मुले आणि २ मुलींचा सामावेश आहे. एचआयव्ही बाधित व्यक्तीला टॅटू काढताना वापरलेली सुई इतरांना वापरल्याने १२ जणांना एचआयव्हीची लागण झाली आहे. टॅटू काढण्यासाठी वापरण्यात येणारी साधनं निर्जंतुक न केल्यामुळे १२ जणांना HIV ची लागण झाल्याचे बोलले जात आहे.


दरम्यान, डॉक्टरांनी सांगितले की,' एचआयव्ही (HIV) हा विषाणू आहे. तो हवेच्या संपर्कात आला, तर लगेच नष्ट होतो. एखाद्या व्यक्तीला टॅटू काढल्यानंतर वापरलेली सुई लगेच दुसऱ्या व्यक्तींना वापरली जात नाही.वापरली तरी हा विषाणू हवेच्या संपर्कात आल्यावर नष्ट होतो. त्यामुळे टॅटूच्या माध्यमातून HIVची लागण होण्याची शक्यता फार कमी आहे. जवळपास नाही, अशा पद्धतीत आहे', अशी वाराणसीच्या सदर घटनेवर एका डॉक्टरांनी प्रतिक्रिया दिली आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies