Type Here to Get Search Results !

उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी आज संसद भवनात मतदानाला सुरुवात! पंतप्रधान मोदींनी बजावला मतदानाचा हक्क!



नवी दिल्ली : देशाच्या नवीन उपराष्ट्रपतीच्या निवडीसाठी आज संसद भवनात मतदानाला सुरुवात झाली आहे. सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत मतदान होणार आहे. त्यानंतर लगेचच मतमोजणी होणार असून संध्याकाळी उशिरापर्यंत देशाच्या नव्या उपराष्ट्रपतींच्या नावाची घोषणा होणार आहे. राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे जगदीप धनखर आणि विरोधी पक्षाच्या संयुक्त उमेदवार मार्गारेट अल्वा यांच्यात लढत आहे. 



दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निवडणुकीत मतदान केले आहे. तसेच विद्यमान उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांचा कार्यकाळ संपल्यानंतर एक दिवस ११ ऑगस्ट रोजी पुढील उपराष्ट्रपती पदाची शपथ घेतील.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies