Type Here to Get Search Results !

“गुलामगिरीचे ओझे उतरवून; नौदलाचा नवा ध्वज छत्रपती शिवाजी महाराजांना समर्पित”



कोची: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते आज कोचीच्या शिपयार्डमध्ये स्वदेशी आयएनएस विक्रांत हे युद्धवाहू जहाज आज नौदलाच्या ताफ्यात दाखल झाले. मोदींच्या हस्ते यावेळी भारतीय नौदलाच्या नव्या ध्वजाचंही अनावरण करण्यात आले. नौदलाचा नवा ध्वज छत्रपती शिवाजी महाराजांना समर्पित करत असल्याचं मोदींनी वक्तव्य केले. 



पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, आज २ सप्टेंबर २०२२ या ऐतिहासिक दिवशी इतिहास बदलून टाकणारी आणखी एक घटना घडली आहे. आज भारताने गुलामगिरीचे ओझे उतरवले आहे. भारतीय नौदलाला आजपासून नवा ध्वज मिळाला आहे. आतापर्यंत भारतीय नौदलाच्या ध्वजावर गुलामगिरीची ओळख होती. मात्र आजपासून छत्रपती शिवरायांच्या प्रेरणेने नौदलाचा नवा झेंडा समुद्रात आणि आकाशात डौलानं फडकणार आहे.



"छत्रपती शिवाजी महाराजांनी सागरी शक्तीच्या बळावर असं नौदल उभारलं की ज्यामुळे शत्रूंची झोप उडाली. इंग्रज भारतात आले तेव्हा त्यांना भारतीय जहाजांची ताकद आणि त्याद्वारे होणारा व्यापार याची भीती वाटायची. म्हणूनच त्यांनी भारताच्या सागरी शक्तीचे कंबरडे मोडण्याचा निर्णय घेतला. त्याकाळी ब्रिटीश संसदेत कायदा करून भारतीय जहाजे आणि व्यापार्यांरवर किती कडक निर्बंध लादले गेले याचा इतिहास साक्षीदार आहे", असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. 



दरम्यान, नौदलाच्या नव्या निशाणावरुन आता सेंट जॉर्ज क्रॉस हटवण्यात आले आहे. नव्या निशाणात डाव्या बाजूस तिरंगा आणि उजव्या बाजूस निळ्या रंगाच्या बॅकग्राऊंडवर सोनेरी रंगात अशोक चिन्ह साकारण्यात आलेलं आहे. त्याखाली संस्कृत भाषेत 'शं नो वरुण:' असे] लिहीण्यात आले आहे. 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies