Type Here to Get Search Results !

मामाने लग्नासाठी मुलगी देण्यास नकार दिल्याने भाच्याने केले भयंकर कृत्य!



नांदेड : नांदेड जिल्ह्यात  मामाने लग्नासाठी मुलगी देण्यास नकार दिला, म्हणून भाच्याने मामाचीच हत्या केली. या प्रकरणातील आरोपी भाच्यास पोलिसांनी अटक केली आहे. 



याबद्दल अधिक माहिती अशी कि, नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यामध्ये भाचा काहीही काम करत नाही, म्हणून मामाने आपली मुलगी देण्यास त्याला नकार दिला होता. ‘हुंडा नको, पण लग्नासाठी मुलगी दे’, अशी मागणी घालत भाचा मामाजवळ आला होता. पण मामाने मुलगी देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भाच्याने अर्धापूर तालुक्यातील चाभरा इथे 9 सप्टेंबर रोजी रात्री घराबाहेर बालाजी दिगंबर काकडे हे झोपले होते. त्यावेळी त्यांच्यावर एकाने कुऱ्हाडीने वार करत हल्ला केला.



दरम्यान, या प्रकरणी हदगाव तालुक्यातील मनाठा पोलीस ठाण्यातील पोलिसांनी गुन्हा दाखल करुन घेत  भाचा एकनाथ बंडू जाधव याला अटक केली. आरोपीचे वय 19 वर्ष आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies