Type Here to Get Search Results !

शिंदें गटाचा ठाकरेंना धक्का; ‘येथील’ महानगर प्रमुख पदाच्या नियुक्तीची केली घोषणा!



नाशिक : शिवसेनेत पडलेली उभी फुट आता अधिकची मजबूत होऊ लागली आहे. अशातच आता एकनाथ शिंदे यांच्याकडून ठिकठिकाणी पदाधिकारी नेमून पक्षबांधणीचे काम सुरू झाले आहे. आता नाशिक शहराच्या महानगर प्रमुख या पदाच्या बाबत नियुक्ती पत्र देत घोषणा केली आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांना अशा नियुक्त्या देऊन शिंदे यांनी धक्का दिल्याचे बोलले जात आहे.



दरम्यान, नाशिक महानगर प्रमुख पदी प्रवीण तिदमे यांची नियुक्ती करण्यात आल्याचे पत्र त्यांनी सोशल मिडियावर शेयर केले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हे नियुक्ती पत्र तिदमे यांना स्वतः दिले आहे.  ही नियुक्ती करत असतांना नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांचीही उपस्थिती यावेळी दिसून आली आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies