Type Here to Get Search Results !

“विनायक राऊत यांना शिंदे गटात यायचे होते परंतु, भाजप नेतृ्त्वाने त्यांना नकार दिला”: ‘यांचा’ मोठा खुलासा!



मुंबई: विनायक राऊत हे सध्या शिवसेनेत असले तरी त्यांना शिंदे गटात यायचे होते. केवळ भाजप नेतृत्वाने त्यांना ना केल्याने ते आता शिवसेनेत आहेत. अन्यथा ते देखील शिंदे गटातच दिसले असते. नाहीतर आता ते 12 महिन्याच्ये खासदार राहिले असल्याची टीका नितेश राणे यांनी केली आहे. त्या 12 खासदारांबरोबर येण्याची तयारी विनायक राऊत यांनी दर्शवली पण भाजप नेतृ्त्वाने त्यांना नकार दिल्याचे राणे म्हणाले आहेत.


दरम्यान, शिंदे सरकारची स्थापना होऊन आता तीन महिने होत आहेत. मात्र, दिवसागणीस वेगळाच खुलासा हा समोर येत आहे. आमदारांपाठोपाठ शिवसेनेचे 12 खासदार हे शिंदे गटामध्ये दाखल झाले होते. अशातच आता भाजपाचे नितेश राणे यांनी धक्कादायक खुलासा केला आहे.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies