मुंबई: आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्यांना देशभरातून शुभेच्छा दिल्या जात आहे. देशातल्या विविध भागांमध्ये पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ट्विटरवरुन शुभेच्छा दिल्या आहेत. “पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा. त्यांना दीर्घायुष्य व निरोगी आयुष्य लाभो हीच सदिच्छा”, असे ट्विट खासदार शरद पवार यांनी केले आहे.