Type Here to Get Search Results !

आजचे राशीभविष्य, सोमवार १२ सप्टेंबर २०२२; जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस!




मेष :

जोडीदाराचे सहकार्य अपेक्षित राहील. खेळ व मनोरंजन यात वेळ निघून जाईल. कटू प्रसंगाचे रूपांतर गोडव्यात कराल. अतिविचार करत राहू नये. चांगली बातमी समजेल.



वृषभ:

भावंडांसोबत अनमोल क्षण घालवाल. जवळच्या प्रवासाची संधी मिळेल. सामाजिक बांधीलकी विसरून चालणार नाही. जोडीदार तुमच्यावर खुश राहील. हातातील कलेचे कौतुक केले जाईल.



मिथुन:

चालत आलेली संधी ओळखा. मन प्रसन्न राहील. कामातून समाधान मिळेल. मित्रांचा रोष गोडीने कमी करावा. जोडीदाराकडून आश्चर्यचकित केले जाईल.



कर्क:

मुलांसाठी चांगला काळ आहे. मुलांच्या जबाबदाऱ्या उत्तमरीत्या पार पाडाल. हातात नवीन अधिकार येतील. नवीन नोकरी शोधात असणार्यांजना यश येईल. आपल्या कर्तुत्वाला भरारी घेता येईल. 



सिंह:

विरोधक नामोहरम होतील. नोकरीमध्ये चांगला काळ असेल. आपल्या तब्येतीप्रमाणे खाण्या-पिण्याची पथ्ये पाळावीत. व्यापार्यां च्या प्रयत्नाला यश येईल. आत्मविश्वासाने निर्णय घ्या.



कन्या:

मेहनत, आणि प्रयत्न यांची कास सोडू नये. आपले मत उत्तमरीत्या मांडू शकाल. मुलांकडून शुभ वार्ता मिळतील. मनातील इच्छा पूर्ण होईल. प्रेमातील व्यक्तींना उत्तम दिवस.



तूळ:

झोपेची तक्रार जाणवेल. संपूर्ण दिवस धावपळीत जाईल. दिवसाची सुरुवात उत्साहात कराल. जोडीदाराचे वर्चस्व राहील. बोलण्यातून इतरांची माने जिंकाल.



वृश्चिक:

एखादी जुनी समस्या संपुष्टात येईल. जुनी येणी वसूल होतील. पोटाच्या विकारांकडे दुर्लक्ष करू नका. अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवावे. आजचा दिवस मनासारखा जाईल.



धनू:

क्रोधवृत्तीत वाढ होईल. खर्चावर नियंत्रण ठेवा. विरोधक परास्त होतील. कार्यालयात प्रशंसेस पात्र व्हाल. मनातील नसत्या शंका काढून टाकाव्यात.



मकर:

जुनी खोळंबलेली कामे मार्गी लागतील. मनातील इच्छा पूर्ण होईल. आर्थिक पातळीवर यशकारक दिवस. मिळकतीच्या बाबतीत केलेले प्रयत्न यश देतील. इतरांच्या विश्वासाला खरे उतरा.



कुंभ:

नोकरी-व्यवसायात सन्मान मिळेल. भावंडांची मदत मोलाची ठरेल. नवीन ओळख वाढवावी. दिवस धावपळीत जाईल. मन प्रसन्न राहील.



मीन:

चारचौघात कौतुकास पात्र व्हाल. चांगल्या गोष्टीसाठी खर्च कराल. गोड शब्दात मत मांडावे. शक्यतो नातेवाईकांशी व्यवहार टाळावेत. घरातील महत्त्वाच्या कामात हातभार लावाल.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies