Type Here to Get Search Results !

“BMC निवडणूक ही आपल्या जीवनातील शेवटली निवडणूक आहे असे समजून लढा”!मुंबई: केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते अमित शाह  हे मुंबई दौऱ्यावर आहेत. त्यांच्या उपस्थितीत भाजपच्या 200 पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. यावेळी मार्गदर्शन करताना फडणवीस यांनी भाजपकडून आगामी मुंबई महापालिका निवडणुकीचे रणशिंग फुंकले. देवेंद्र फडणवीस   म्हणाले, आगामी मुंबई महापालिका निवडणूक ही आपल्यासाठी शेवटची निवडणूक आहे, असे समजून लढा अशा  आवेशपूर्ण  शब्दात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महापालिका निवडणुकीसाठी दंड थोपटले आहेत. तसेच ते पुढे म्हणाले की,  मुंबईत ओरिजनल शिवसेना आमच्यासोबत आली आहे. गणेशोत्सवात सगळीकडे भाजपचाच बोलबाला आहे. या भरवशावर शिवसेना राजकारण करत असते आपण त्यांना मागे टाकू. आपल्या जीवनातील ही शेवटली निवडणूक आहे असे माना आणि अभी नही तो कभी नही असे ठरवा. आता केवळ एकच लक्ष्य-मुंबई महानगरपालिका असल्याचे आवाहन फडणवीसांनी केले. आपले 'मिशन मुंबई' साठी सर्व पदाधिकरी नगरसेवक भाजपा कार्यकर्त्याचे महत्वाची भूमिका आहे. आता सर्वांनी तयारी जोरदार करायची असेही फडणवीसांनी म्हटले. वॉर्ड रचना काय होईल, कसा प्रभाग असेल याचा विचार करून चालणार नाही, काम करत रहावे असेही त्यांनी म्हटले.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies