Type Here to Get Search Results !

" ...म्हणून अंधेरी पोटनिवडणूकीत ऋतुजा लटके यांचाच विजय होणार”!



मुंबई :आमदार रमेश लटके यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक होत आहे. या पोटनिवडणुकीसाठी भाजपा आणि बाळासाहेबांच्या शिवसेनेकडून मुरजी पटेल तर महाविकास आघाडीकडून ऋतुजा लटके यांना उमेदवारी देण्यात आली आहे. दरम्यान या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीचे नेते आणि माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील  यांनी प्रतिक्रिया दिली आहे.



अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीत विजय हा महाविकास आघाडीच्याच उमेदवाराचा होईल, व विजय आमच्याच उमेदवाराचा होईल कारण ऋतुजा लटके यांना काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना असा तीन पक्षांचा पाठिंबा आहे. तसंच राज्यात गेले काही दिवस सुरू असलेलं राजकारण जनतेने पाहिलं आहे. त्यामुळे जनताही या सगळ्याला योग्य ते उत्तर देईल. ऋतुजा लटके विजयी होतील, असे दिलीप वळसे पाटील म्हणाले आहेत.



दरम्यान, वळसे पाटलांसह महाविकास आघाडीचे नेते अंधेरीतील निवडणुकीत विजय आमचाच, असा दावा करत आहेत.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies