Type Here to Get Search Results !

देवदर्शनासाठी निघालेल्या विद्यार्थ्यांच्या कारला अपघात; दोघांचा जागीच मृत्यू!




नारायणपूर: पुण्याहून नारायणपूर येथे देवदर्शनासाठी निघालेल्या एमआयटीच्या विद्यार्थ्यांच्या कारला सासवड कापूरहोळ रस्त्यावर अपघात झाला. या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला तर पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. या अपघातात रचित मेहता, गाैरव लालवाणी अशी मयत दोघांची नावे आहेत. 



याबद्दल अधिक माहिती अशी कि, अपघातग्रस्त विद्यार्थी हे वेगवेगळ्या राज्यातील आहेत. ते पुण्यातील एमआयटी कॉलेजमध्ये शिक्षण घेत आहेत. मंगळवारी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती उपलब्ध झाली आहे.


 

दरम्यान, नारायणपूरच्या स्थानिक नागरिकांनी तात्काळ जखमींना कारमधून बाहेर काढून सासवड येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. 



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies