Type Here to Get Search Results !

उद्धव ठाकरेंना मोठा दिलासा; काँग्रेसने घेतला ‘हा’ मोठा निर्णय!




मुंबई : अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार रमेश लटके यांच्या आकस्मित निधनामुळे अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक लागलेली आहे. या निवडणुकीत काँग्रेस पक्ष आपला उमेदवार देणार नसून महाविकास आघाडी म्हणून शिवसेनेच्या उमेदवाराला पाठिंबा देणार आहे, अशी घोषणा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.



दरम्यान, शिवसेनेत फूट पडल्यानंतर अंधेरी येथील पोटनिवडणुकीच्या माध्यमातून मोठी निवडणून नोव्हेंबरमध्ये पार पडत आहेत. या निवडणुकीत उद्धव ठाकरे आणि शिंदे गटाला आपली ताकद दाखवण्याची संधी आहे. काँग्रेसने या निवडणुकीत शिवसेनेला पाठिंबा दिल्याने उद्धव ठाकरेंना मोठा दिलासा मिळाला आहे.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies