Type Here to Get Search Results !

काय करावं आता : ‘बॉयफ्रेंड’ वरून दोन तरुणींमध्ये फ्रिस्टाईल हाणामारी



यवतमाळ : या जगामध्ये कोणाचे कोणासोबत कशावरून भांडण होईल हे सांगता येत नाही तसा तुम्हालाही अंदाज बांधता येणार नाही. असाच  काहीसा प्रकार यवतमाळ जिल्ह्यातील वणी येथे घडला असून ‘बॉयफ्रेंड’ वरून दोन तरुणींमध्ये फ्रिस्टाईल हाणामारी झाली. अन या घटनेची चर्चा सगळीकडे झाली.


वणी येथील छत्रपती शिवाजी महाराज उद्यानात २५ फेब्रुवारीला दुपारी महाविद्यालय सुटल्यानंतर दोन मैत्रिणी विरंगुळा म्हणून गेल्या. तेथे गेल्यानंतर एका मुलावरून त्यांच्यात वाद सुरू झाला. या वादाचे पर्यावसन थेट हाणामारीत झाले. दोघींनीही एकमेकींना धक्काबुक्की करून लाथांनी मारहाण करायला लागल्या. एकमेकींचे केस ओढून अश्लील भाषेत शिवीगाळ करायला लागल्या. एकीने दुसरीचा मोबाईल फोनही जोरात आपटल्याने फुटला.


अनेकांनी या फ्रिस्टाईलचे मोबाईलमध्ये चित्रीकरण केले. अखेर उद्यानाच्या सुरक्षा रक्षकाने या दोघींनाही उद्यानाबाहेर हाकलून लावले. हा वाद एका बॉयफ्रेंडवरून झाल्याची चर्चा आहे. मात्र, याची कोठेही तक्रार करण्यात आली नाही. इतका वाद होऊनही त्या दोन तरुणी दुसऱ्यादिवशीही त्याच उद्यानात गेल्या होत्या. तेव्हा तेथील सुरक्षा रक्षकाने त्यांच्याकडून भांडणार नाही, अशी हमी घेतल्यानंतरच त्यांना आत प्रवेश दिल्याचे सांगण्यात येते. (स्त्रोत:लोकसत्ता)



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies