Type Here to Get Search Results !

अजित पवारांनी घेतली उपमुख्यमंत्री पदाची शपथ : अजित पवारांच्या बरोबर “यांनी” घेतली मंत्रीपदाची शपथ



माणदेश एक्सप्रेस न्युज : मुंबई : आज शिंदे आणि फडणवीस सरकारमध्ये अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. त्यामुळे अजित पवार यांनी चार वर्षात तिसऱ्यांदा उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे.


दरम्यान, आज सकाळपासून अजित पवारांच्या देवगीरी बंगल्यावर समर्थक आमदारांची बैठक सुरू होती. या बैठकीनंतर पवार राजभवनावर दाखल झाले आहे. त्यामुळे अजित पवार शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील आहे.


त्यामुळे महाराष्ट्रात पुन्हा एकदा राजकीय भूंकप घडला आहे. अजित पवार यांनी काही दिवसांपूर्वी मला विरोधी पक्षनेतेपदाच्या जबाबदारीतून मुक्त करा आणि पक्ष संघटनेची जबाबदारी द्या, अशी मागणी केली होती. त्यानंतर अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नाराज असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या.


अजित पवारांच्या नंतर राष्ट्रवादी मंत्री म्हणून छगन भुजबळ, दिलीप वळसे-पाटील, धनंजय मुंडे हसन मुश्रीफ, धर्मरावबाबा आत्राम, आदिती तटकरे, संजय बनसोडे, अनिल पाटील यांनी ही मंत्री पदाची शपथ घेतली आहे.



إرسال تعليق

0 تعليقات
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies