Type Here to Get Search Results !

आटपाडी : बेंदूर सणाचे औचित्य साधून जिल्हा परिषद शाळेतील चिमुकल्यांचा अनोखा उपक्रम



आटपाडी/रेश्मा राजगे : आटपाडी तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कामथ येथील विद्यार्थ्यांनी आज शनिवार दि. १ जुलै रोजी लहान चिमुकल्यांनी कौतुकास्पद असा अनोखा उपक्रम राबवला.


बेंदूर आणि पोळा हा सण साजरी करण्याची पद्धत बहुतांश पणे सारखीच आहे. मात्र बेंदूर हा सण आषाढ पौर्णिमेला साजरा केला जातो. तर पोळा किवा बैल पोळा हा सण श्रावण अमावस्येला साजरा केला जातो.


त्याचबरोबर शेतकऱ्यांचा सोबती असलेल्या बैलांबाबत कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा सण साजरी केला जातो. आपल्या सर्वांनाच माहित आहे की बैल हा असा एकमेव प्राणी आहे जो शेतकऱ्याला शेतामध्ये खूपच मोठ्या प्रमाणामध्ये मदत करत असतो. म्हणूनच आजही बेलाला शेतकऱ्याचा वाघ असे म्हटले जाते. बैल हा शेतकऱ्याचा सगळ्यात जवळचा आणि जिवाभावाचा जीवनसाथी असतो .


म्हणूनच जिल्हा परिषद शाळा कामथ येथील चिमुकल्यांनी आज मातीपासून चक्क बैल तयार करणे. हा उपक्रम राबवला होता. ज्यामध्ये त्यांनी खूप चांगल्या प्रकारे मातीपासून बैल तयार केले आहेत. त्यामुळे या लहान विद्यार्थ्यांच कौतुक देखील होत आहे.


 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies