Type Here to Get Search Results !

पुणे येथे होलार समाजाचा वधु-वर पालक परिचय मेळावा संपन्न पुणे येथे होलार समाजाचा वधु-वर पालक परिचय मेळावा संपन्न 

माणदेश एक्सप्रेस न्युज : पुणे : येथील  आकुर्डी येथे दिनांक २४ जून  रोजी होलार  समाजाचा वधू-वर पालक परिचय मेळावा भारतीय होलार समाज जीवनसाथीचे संस्थापक अध्यक्ष पांडुरंग ऎवळे यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला. या मेळाव्यात मुले व मुली यांची एकूण २८९ अधिकृत नोंदणी झाली.


या मेळाव्यात बोलताना आम. रविंद्र धंगेकर म्हणाले, सध्या  वधू-वर पालक परिचय मेळावे भरवणे ही काळाची गरज आहे. तसेच होलार समाजासाठी अभ्यास आयोग नेमण्यासाठी पाठपुरावा करण्या बरोबरच होलार समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळ समाजभूषण वि.दा. ऐवळे यांच्या नावाने करण्याचा पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले आहे. 


मेळाव्याचे  स्वागताध्यक्ष पांडुरंग ऐवळे म्हणाले, होलार समाजातील अनेक जण नोकरी व व्यवसायासाठी वेगवेगळ्या ठिकाणी विखुरल्याले आहेत त्यांचे राहण्याचे ठिकाणही माहीत होत नाही. कोणाची मुले-मुली लग्नाची आहेत, हे ही समजणे जिकिरीचे झाले. अशात मुलांचे लग्न जमवणे अवघड होऊन बसले आहे. ही अडचण दूर करण्यासाठी मेळावे घेणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले.


या मेळाव्यात मुंबई, ठाणे, नाशिक, सोलापूर , नंदुरबार, यवतमाळ, धुळे, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा,येथून उपवर तरुणी-तरुण सहभागी झाले होते. या मेळाव्यासाठी होलार समाजातील राजेश जावीर, उद्योजक नवनाथ ऐवळे , डीआरडीओ चे अधिकारी भगवान ढोबळे, अप्पर सचिव सुनील भाजनवळे,उद्योजक अशोक नराळे,रमाकांत भजनावळे, शिवाजीराव जावीर, होलार समाज यंग ब्रिगेड चे अध्यक्ष दादासाहेब नामदास, अभियंता विनायक ऐवळे,  भगवान जावीर, तानाजी भंडगे, माजी सरपंच कोळेचे मारुती हात्तेकर, शिवाजीराव ऐवळे, सोमनाथ ऐवळे, ॲड. डी.एन. भंडगे साहेब, ॲड.जी.एन. ऐवळे, नाशिक येवलाचे जितेंद्र जाधव,उद्योजक सचिन केंगार, ॲड.पांडुरंग भजनवाळे, रामचंद्र हातकट्टी आदी मान्यवर उपस्थित होते.


कार्यक्रमाचे आयोजन चंद्रकांत ऐवळे, महेश भंडगे, विक्रांत केंगार, शशिकांत गुळगे, ऋषिकेश ऐवळे, जनार्दन केंगार, प्रमोद पारसे, जयश्रीताई भजनावळे, शारदाताई हत्तीकट्टी,अनुराधा खांडेकर यांनी केले तर, सुत्रसंचलन प्राचार्य प्रभावतीताई ढोबळे यांनी केले

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies