Type Here to Get Search Results !

विधानसभा निवडणुका : काँग्रेसकडून तीन राज्यातील 229 उमेदवारांची घोषणा



माणदेश एक्सप्रेस न्युज : नवी दिल्ली : देशामध्ये होवू घातलेल्या मध्यप्रदेश, छत्तीसगड आणि तेलंगणा निवडणुकीसाठी काँग्रेसने उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. यामध्ये मध्यप्रदेशातील विधानसभेच्या 230 पैकी 144  जागा, छत्तीसगडमधील 90 पैकी 30 जागा, तर तेलंगणातील 119 जागांपैकी 55 जागांसाठी पक्षाने उमेदवार जाहीर केले आहेत. 


तेलंगणा : पाच विद्यमान आमदारांना तिकीट 

तेलंगणामध्ये पक्षाने पहिल्या यादीत पाचही विद्यमान आमदारांना तिकीट मिळाले आहे. त्यापैकी करीमनगर जिह्यातील मंथनी मतदारसंघातून दुडिला श्रीधर बाबू, मेंडक जिह्यातील संगारेड्डी विधानसभा मतदारसंघातून थुरूपू जग्गा रेड्डी, वारंगल जिह्यातील मुलुग राखीव जागेवरून दानसारी अनसूया सीताक्का हे पुन्हा लढणार आहेत. तसेच भट्टी विक्रमार्क मल्लू यांना खम्मम जिह्यातील मधीरा राखीव जागेवरून पुन्हा तिकीट देण्यात आले आहे. नालगोंडा लोकसभा मतदारसंघाचे खासदार उत्तम कुमार रेड्डी यांना नालगोंडा जिह्यातील हुजूर नगर विधानसभा मतदारसंघातून तिकीट देण्यात आले आहे. 

2018 च्या विधानसभा निवडणुकीतही त्यांनी या जागेवरून विजय मिळवला होता. मात्र, ते खासदार झाल्यानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत ही जागा सत्ताधारी पक्ष टीआरएसकडे गेली. बीआरएसमधून काँग्रेसमध्ये दाखल झालेले मलकानगिरीचे आमदार हनुमंत राव मैनमपल्ली यांना पक्षाने येथून तिकीट दिले आहे. पक्षाने हनुमंत राव यांचा मुलगा डॉ. रोहित मैनामपल्ली यांना मेडक जिह्यातील मेडक विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे.



छत्तीसगड : मुख्यमंत्र्यांसह 30 जणांची यादी

काँग्रेसने 90 आमदार संख्या असलेल्या छत्तीसगड विधानसभेसाठी 30 जागांसाठी उमेदवार जाहीर केले आहेत. पहिल्या यादीत मुख्यमंत्री भूपेश बघेल आणि उपमुख्यमंत्री टी. एस. सिंह देव यांचीही नावे आहेत. बघेल यांनी त्यांच्या पारंपरिक पाटण मतदारसंघातून निवडणूक लढवली आहे. येथे त्यांचा सामना भाजपचे उमेदवार आणि त्यांचे पुतणे विजय बघेल यांच्याशी होणार आहे. विजय सध्या भाजपचे खासदार आहेत. तसेच पक्षाने पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री टी. एस. सिंहदेव यांना अंबिकापूरमधून तिकीट दिले आहे. मंत्रिमंडळात समाविष्ट सर्व 13 मंत्र्यांना पुन्हा तिकीट देण्यात आले आहे. पॅबिनेट मंत्री आणि दुर्ग ग्रामीणचे आमदार ताम्रध्वज साहू पुन्हा या जागेवरून निवडणूक लढवणार आहेत.



मध्यप्रदेश : माजी मुख्यमंत्र्यासह १४४ उमेदवार जाहीर 

मध्यप्रदेशात सर्वाधिक 144 उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. माजी मुख्यमंत्री कमलनाथ पुन्हा एकदा छिंदवाडा मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. राघोगडमधून माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांचा मुलगा जयवर्धन सिंह रिंगणात उतरणार आहेत. जयवर्धन सिंह तर दिग्विजय यांचे भाऊ लक्ष्मण सिंह हेही चचोडा मतदारसंघातून पुन्हा एकदा नशीब आजमावणार आहेत.



إرسال تعليق

0 تعليقات
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies