Type Here to Get Search Results !

आटपाडी : श्रीमंत बाबासाहेब देशमुख महाविद्यालयात ब्युटी पार्लर कोर्स चे उद्घाटन संपन्न

  



आटपाडी:  येथील श्रीमंत बाबासाहेब देशमुख महाविद्यालयांमध्ये राष्ट्रीय कौशल्य विकास योजनेअंतर्गत माईल स्टोन स्कील फाउंडेशन ऑफ इंडिया आणि स्पर्धा परीक्षा नोकरी मार्गदर्शन कक्षाच्या वतीने विद्यार्थिनी साठी तीन महिन्याचा बेसिक ब्युटी पार्लर कोर्स चे उद्घाटन आटपाडी तालुक्याच्या वैद्यकीय अधिकारी सौ साधना पवार यांच्या हस्ते झाले संपन्न झाले. 


 बोलताना त्या असे म्हणाल्या की, विद्यार्थिनींनी नवनवीन कौशल्य आत्मसात करून स्वतःच्या पायावर उभे राहावे, नवीन कौशल्य आत्मसात केल्याशिवाय भविष्यात युवतींना रोजगार संधी मिळणार नाहीत म्हणून महाविद्यालयांमध्ये ज्या ज्या संधी उपलब्ध आहे त्याचा लाभ घ्यावा. 


अध्यक्ष मनोगत व्यक्त करताना प्राचार्य डॉ. एस एम भोसले सर यांनी राष्ट्रीय कौशल्य विकास कार्यक्रम व त्या कार्यक्रमांतर्गत महाविद्यालयांमध्ये सुरू होणाऱ्या विविध कोर्सची माहिती दिली. पंतप्रधानांच्या स्वप्नातील भारत घडवायचा असेल तर  विद्यार्थिनींनी कौशल्य आत्मसात केली पाहिजेत.

 

हे महाविद्यालय ग्रामीण भागात आहे, ग्रामीण भागातील विद्यार्थिनींना उच्च दर्जाच्या विविध कौशल्यपूर्ण संधी मिळावी म्हणून महाविद्यालय सातत्याने प्रयत्न करत आहे आणि या प्रयत्नातूनच जीएसटी टॅली कोर्स बरोबरच  विद्यार्थिनी साठी बेसिक ब्युटी पार्लर कोर्स आज आपण सुरू करत आहोत.


 या कोर्सचा अधिकाधिक विद्यार्थ्यांनी फायदा घेऊन भविष्यात आपले करिअर घडवावे असे ते म्हणाले. या कार्यक्रमाला माईल स्टोन स्किल फाउंडेशन ऑफ इंडियाचे श्री राहुल कोळी आणि सौ नलिनी कोळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.या कार्यक्रमाचे संयोजन डॉ. सुजाता देशमुख व डॉ. हणमंत सावंत यांनी केले .



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies