Type Here to Get Search Results !

Word Cup 2023 : विश्वचषकात ऑस्ट्रेलियाने रचला इतिहास : सर्वात मोठ्या विजयाची केली नोंद : मॅक्सवेलचे विक्रमी शतक



AUS vs NED, Word Cup 2023: विश्वचषकात आजच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नेदरलँड्सचा ३०९ धावांनी पराभव करत मोठ्या विजयाची नोंद करत इतिहास केला. 


ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी स्वीकारत ५० षटकांत आठ गड्यांच्या मोबदल्यात ३९९ धावा केल्या. कांगारू संघासाठी डेव्हिड वॉर्नर आणि ग्लेन मॅक्सवेल यांनी विक्रमी शतके झळकावली. वॉर्नरने सहावे शतक झळकावून माजी कर्णधार रिकी पाँटिंगचा विक्रम मोडला. विश्वचषकाच्या इतिहासात सर्वाधिक शतके झळकावणारा तो ऑस्ट्रेलियन खेळाडू ठरला. तर, मॅक्सवेलने शेवटच्या षटकांमध्ये झंझावाती खेळी खेळली आणि अवघ्या ४० चेंडूत आपले शतक पूर्ण केले. विश्वचषकात सर्वात कमी चेंडूत शतक झळकावणारा तो खेळाडू ठरला. वॉर्नरने ९३ चेंडूत १०४ तर मॅक्सवेलने ४४ चेंडूत १०६ धावा केल्या.


वॉर्नर आणि मॅक्सवेल व्यतिरिक्त स्टीव्ह स्मिथने ७१ आणि मार्नस लाबुशेनने ६२ धावा केल्या. जोश इंग्लिशने १४ आणि कर्णधार पॅट कमिन्सने नाबाद १२ धावा केल्या. मिचेल मार्श नऊ धावा करून आणि कॅमेरून ग्रीन आठ धावा करून बाद झाले. मिचेल स्टार्क खातेही उघडू शकला नाही. एडन झाम्पाने एक धाव घेतली. नेदरलँड्सकडून लोगान व्हॅन बीकने सर्वाधिक चार विकेट्स घेतल्या. बास डी लीडेला दोन यश मिळाले. आर्यन दत्तने एक विकेट घेतली.


मोठ्या धाव संख्येचा पाठलाग करताना नेदरलँडची फलंदाजी ढेपाळली. त्यांना ३०९ धावांनी पराभव स्वीकारावा लागला. ऑस्ट्रेलियन फिरकीपटू अॅकडम झाम्पाने सर्वाधिक चार विकेट्स घेतल्या. मिचेल मार्शला दोन यश मिळाले. मिचेल स्टार्क, जोश हेझलवूड आणि पॅट कमिन्स यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली. नेदरलँडचे केवळ पाच फलंदाज दुहेरी आकडा पार करू शकले. 


विक्रमजीत सिंगने सर्वाधिक २५ धावा केल्या. तेजा नदामानुरूने १४, स्कॉट एडवर्ड्सने नाबाद १२, सायब्रँडने ११ आणि कॉलिन अकरमनने १० धावा केल्या. मॅक्स ओड्डाड सहा धावा करून बाद झाला, बास डी लीडेने चार आणि आर्यन दत्तने एक धाव केली. लोगान व्हॅन बीक, रोएलॉफ व्हॅन डर मर्वे आणि पॉल व्हॅन मीकरेन यांना खातेही उघडता आले नाही.


 


🪀 WhatsApp वर न्यूज/जॉब्स/माहिती-मनोरंजन 'माणदेश एक्सप्रेस' Free जॉईन करा, त्यासाठी क्लिक करा








إرسال تعليق

0 تعليقات
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies