Type Here to Get Search Results !

आटपाडी तालुक्यातील “ही” ग्रामपंचायत झाली बिनविरोध : लोकनियुक्त सरपंचपदी युवतीला संधी



माणदेश एक्सप्रेस न्युज : आटपाडी : आटपाडी तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीसाठी आज अर्ज माघारी घेण्याच्या दिवशी मुढेवाडी ग्रामपंचायत बिनविरोध झाली असून ग्रामपंचायत स्थापनेपासून आजपर्यंत सलग सातव्यांदा ग्रामपंचायत ही बिनविरोध झाली आहे.


आटपाडी तालुक्यातील मुढेवाडी ग्रामपंचायत ही सन १९९३ साली स्थापन झाली आहे. ग्रामपंचायत स्थापनेपासून आज पर्यंत सलग सहा वेळा ग्रामपंचायत बिनविरोध निवडून आणण्यात गावकरी यशस्वी होत होते. आटपाडी तालुक्यातील १७ ग्रामपंचायत निवडणुकीचा पंचवाषिक कार्यक्रम जाहीर झाला होता. यामध्ये मुढेवाडी ग्रामपंचायतचा देखील समावेश होता.


यावर्षी देखील ग्रामपंचायत बिनविरोध करण्यासाठी गावकरी यांनी बैठक घेत सामोपचाराने तोडगा काढत सात सदस्य बिनविरोध केले होते. परंतु थेट सरपंचपदासाठी मात्र अर्ज आल्याने ही निवडणूक बिनविरोध होणार का? याकडे मुढेवाडी सह तालुक्याचे लक्ष लागून राहिले होते. परंतु आज अर्ज माघारी घेण्याच्या दिवशी थेट सरपंचपदासाठी भरण्यात आलेला अर्ज माघारी घेण्यात आल्याने ग्रामपंचायत बिनविरोध झाली.


मुढेवाडी ग्रामपंचायतीच्या थेट सरपंचपदी प्रथमच युवतीला संधी मिळाली असून उज्वला बाबासो ऐवळे या सरपंचपदी विराजमान झाल्या आहेत. तर सदस्यपदी हिंदुराव दगडू मुढे, सतीश विलास अनुसे, काशिनाथ आबा मुढे, माया किसन मुढे, संगीता मधुकर खोत, रसवंता हणमंत मुढे, कांताबाई विलास मुढे यांची सदस्यपदी निवड झाली आहे. ग्रामपंचायत बिनविरोध करण्यासाठी गावाचे पोलीस पाटील, माजी सरपंच उपसरपंच, सदस्य, सोसायटीचे चेअरमन, व्हा. चेअरमन व गावकरी यांनी प्रयत्न केले.


🪀 WhatsApp वर न्यूज/जॉब्स/माहिती-मनोरंजन 'माणदेश एक्सप्रेस' Free जॉईन करा, त्यासाठी क्लिक करा 




إرسال تعليق

0 تعليقات
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies