Type Here to Get Search Results !

संतापजनक! पैशासाठी जन्मदात्या आईनेच विकलं नवजात बाळाला



 हरियाणातील सिरसा येथे एका आईने पैशाच्या लालसेपोटी स्वतःच्या नवजात बाळाला विकलं. मुलाचे वडील संजीव कौशल याने आरोप केला आहे की त्याची पत्नी प्रियंका हिने तिची आई आणि भावासोबत मुलाची 4.5 लाख रुपयांना विक्री केली आहे. पतीने सांगितलं की, त्याला सांगण्यात आलं की, मूल जन्मल्यानंतर दोन दिवसांनी आजारी पडलं नंतर त्याचा मृत्यू झाला.


पोलिसांनी मुलाची आई प्रियंका, आजी सीमा आणि प्रियंकाच्या भावाला अटक केली आहे. प्रियंकाचं संजीव कौशलसोबतं हे दुसरं लग्न आहे. पतीने सांगितलं की, 13 ऑगस्ट 2022 रोजी प्रियंकासोबत त्याचं लग्न झालं होतं, मात्र काही महिन्यांनंतर त्याच्या भावाला कॅन्सर झाल्याचं निदान झालं. 


प्रियंका गरोदर असल्याचे संजीव कौशलने सांगितलं. नंतर प्रियंकाच्या आईने तिला मुलगा झाल्याचं सांगितलं, पण त्याचा मृत्यू झाला असं म्हटलं. त्यानंतर तो प्रियंकाशी बोलला, मात्र प्रियंकाने त्याला कोणतेही समाधानकारक उत्तर दिले नाही. त्याला संशय आल्याने त्याने सासरच्या शेजाऱ्यांकडे याची चौकशी केली. 


संजीवने पोलिसांत तक्रारही केली होती, मात्र कारवाई झाली नाही. याच दरम्यान, हर्षा मित्तल या व्यक्तीने मुलाची विक्री करण्यास मदत केली होती, त्याने त्याला फोन करून तुला पैसे देतो असं सांगितलं. त्यानंतर हे प्रकरण पोलिसांकडे गेल्याचं संजीवने सांगितले. त्यानंतर, न्यायालयाच्या आदेशानुसार, पोलिसांनी या प्रकरणात आरोपी आई प्रियंकासह 6 जणांविरुद्ध एफआयआर दाखल केला आहे.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies