Type Here to Get Search Results !

आटपाडी : संभाजीराव थोरात तात्या यांच्यावरती गरळ ओकणाऱ्याचा प्रचार निष्ठावंत संघ शिलेदार करु शकत नाही: पोपटराव सूर्यवंशी



 माणदेश एक्स्प्रेस न्यूज: आटपाडी : सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक विकास पतसंस्था निवडणूकीसाठी संघाचे दोन निष्ठावंत उमेदवार रिंगणात उभे आहेत. यामध्ये महिला राज्याध्यक्षा स्वातीताई शिंदे व  तात्यांचे पाईक विश्र्वास पुजारी यांनी उमेदवारी केली आहे. स्वातीताई शिंदे या अतिशय क्रियाशील असल्याने त्यांचा विजय निश्चित आहे. व विश्र्वास पुजारी यांनी आजपर्यंत अनेकांना निवडणुकीत मदत केलेली आहे.


त्यामुळे सर्व संघ शिलेदार यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतील. परंतू संप काळामध्ये एका विक्षिप्त शिक्षकाने आदरणीय तात्यांबद्दल सोशल मीडिया मद्ये अवमानदर्शक व घाणेरड्या भाषेत राज्यभर गरळ ओकली.


आताच्या निवडणुकीत काही स्वार्थी लोकांनी तात्यांबद्दल वाईट बोलणाऱ्यचा प्रचार सुरू केला आहे. अशा विघ्नसंतोषी माणसाला पाठीशी घालण्याचे पाप काहीजण करत आहेत. परंतु निष्ठावंत संघ शिलेदार या गोष्टीचे समर्थन करणार नाहित.या वाईट वृत्तीला धडा शिकवणार असल्याचे बोलून दाखविले.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies