Type Here to Get Search Results !

धक्कादायक: गरबा नृत्य खेळताना युवकांनी मुलीला त्रास दिल्याने वडिल आणि मुलीच्या वडिलांमध्ये मारहाण ; त्यामध्ये वडिलांचा मृत्यू



हरयाणातील फरिदाबाद येथे गरबा नृत्य खेळताना घडलेला धक्कादायक प्रकार समोर आला आहे. फरीदाबाद सेक्टर ८६ येथील बीपीटीपी प्रिंसेज पार्क सोसायटीमध्ये गरबा खेळताना तीन तरुण अचानक तरुणीसोबत नृत्य करु लागले. यावेळी, विरोध करणाऱ्या मुलीच्या वडिलांना मारहाण करण्यात आली. 


बीपीटीपी सोसायटी निवासी प्रेम मेहता (५३) हे विविध संस्थांसाठी रिकव्हरी एजंट म्हणून काम करत आहेत. प्रेम मेहता यांची कन्या कनिकाने पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटले की, दांडिया नाइटमध्ये लक्की व अन्य युवक तिच्यासोबत डान्स करण्यासाठी सरसावले होते. 


त्यावेळी, मी बाजुला झाले, मात्र या युवकांनी डान्स करण्यासाठी माझ्यासोबत जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे, कनिकाने  तिच्या आईला याबाबत सांगितले. मुलीच्या आईने संबंधित युवकांना ओरडल्यावर युवकांनी दोघींनाही शिविगाळ केली. 


मुलगी कनिका आणि पत्नीला होत असलेल्या त्रासामुळे मुलीचे वडिल तरुणांसमोर आले, त्यांनी संबंधित युवकांना रागावले असता युवकांनी तिच्या वडिलांसोबत धक्काबुक्की केली. त्यामध्ये, तिचे वडिल जमिनीवर पडले आणि बेशुद्ध झाले. त्यामुळे, कुटुंबीयांना तात्काळ त्यांना जवळील रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies