Type Here to Get Search Results !

विचित्रदायक: जमिनीच्या वादातून आरोपीने युवकाला ट्रॅक्टरखाली चिरडून मारले...



राजस्थान: भरतपूर भागात जमिनीच्या वादातून रक्तरंजित घटना घडली आहे. एका गटाने दुसऱ्या गटातील युवकाची ट्रॅक्टरनं चिरडून हत्या केली आहे. आरोपी ट्रॅक्टर चालकाने जमिनीवर पडलेल्या युवकाच्या अंगावरून तब्बल ८ वेळा चिरडले


पोलिसांनी मृत युवक अतर सिंहचा मृतदेह पोस्टमोर्टमसाठी हॉस्पिटलला पाठवला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, अड्डा गावात बहादूर गुर्जर आणि अतर सिंह गुर्जर यांच्यात मागील अनेक काळापासून जमिनीचा वाद सुरू आहे. या वादात बुधवारी सकाळी ८ वाजता दोन्ही गट समोरासमोर आले. दोघांनी एकमेकांवर जीवघेणा हल्ला सुरू करत एकमेकांवर दगडफेक केली. त्यात दोन्ही गटाच्या महिलाही सहभागी होत्या.


हल्ल्यावेळी गोळीबारीचा आवाजही गावकऱ्यांनी ऐकला. मारामारीत निरपत नावाचा युवक जमिनीवर पडला. तेव्हा बहादूर गटाच्या युवकाने ट्रॅक्टर निरपतच्या अंगावर घातला. ट्रॅक्टर चालकाला थांबवण्याचा प्रयत्न करण्यात आला परंतु तो थांबला नाही. त्यानं जमिनीवर पडलेल्या निरपतच्या अंगावर ८ वेळा ट्रॅक्टरचे चाक चढवले. त्यात घटनास्थळीच निरपतचा मृत्यू झाला. 


या घटनेनंतर बहादूरचा मुलगा दिनेश आणि दुसऱ्य गटातील अतर सिंह आणि त्याचा मुलगा निरपत, विनोद, दामोदर आणि नातेवाईक यांच्याविरोधात पोलीस तक्रार देण्यात आली होती. सध्या पोलीस घटनास्थळी पोहचले असून त्यांनी तपास सुरू केला आहे. ट्रॅक्टरचालक फरार झाला असून मृत युवकाचा मृतदेह पोस्टमोर्टमसाठी पाठवला आहे.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies