Type Here to Get Search Results !

आटपाडी : गळवेवाडीतील येथील प्राथमिक शिक्षकाला तीन अपत्ये ; सेवेतून निलंबित करण्याची मागणी ; जिल्हा परिषदे समोर गळवेवाडीतील नागरिक करणार उपोषण



माणदेश एक्सप्रेस न्युज : आटपाडी : आटपाडी तालुक्यातील गळवेवाडी येथील रहिवाशी असणाऱ्या प्राथमिक शिक्षकाला तीन अपत्ये असल्याने सदर शिक्षकाला सेवेतून निलंबित करण्याच्या मागणीसाठी सांगली जिल्हा परिषद समोर आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती आटपाडी बाजार समितीचे संचालक शरदचंद्र काळेल यांनी दिली.


याबबात अधिक माहिती अशी, गळवेवाडी येथील रहिवाशी असणारे व सांगली जिल्हा परिषदकडील प्राथमिक शिक्षक विजय गोडसे हे जिल्हा परिषद शाळा प्रकाशवाडी येथे कार्यकर्त आहेत. 


सदर शिक्षकाला तीन अपत्ये असल्याची तक्रार पुराव्यासह जिल्हा शिक्षक अधिकारी यांच्याकडे केली होती. परंतु आज अखेर त्यावर कोणतीही कार्यवाही झाली नसल्याने याबाबत उद्या दिनांक २० रोजी जिल्हा अधिकारी कार्यालया समोर उपोषण करण्यात येणार असल्याचे शरदचंद्र काळेल म्हणाले.



إرسال تعليق

0 تعليقات
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies