Type Here to Get Search Results !

कानकात्रेवाडी ग्रामपंचायतमध्ये ‘सर्वसामान्य शेतकरी, कामगार विकास पॅनेलनेची’ सत्ता येणार : इंजि. दिलीप तनपुरे



माणदेश एक्सप्रेस न्यूज : आटपाडी : आटपाडी तालुक्यातील कानकात्रेवाडी ग्रामपंचायत निवडणुकीसाठी प्रचारात सर्वसामान्य शेतकरी, कामगार विकास पॅनेलचे थेट सरपंच पदाचे उमेदवार इंजि. दिलीप नाना तनपुरे यांनी प्रचारात आघाडी घेतली असून त्यांचा विजय निश्चित मानला जात आहे.


कानकात्रेवाडी ग्रामपंचायत निडणूकसाठी प्रचारात सर्वसामान्य शेतकरी, कामगार विकास पॅनेलने आघाडी घेतली आहे. थेट सरपंचपदासाठी इंजि. दिलीप नाना तनपुरे हे उमेदवार असून त्यांचे चिन्ह नारळाची बाग आहे. तर सर्वसामान्य शेतकरी, कामगार विकास पॅनेलने एक जागा बिनविरोध करून विजयी सलामी दिली आहे.


वॉर्ड क्रमांक एक मधून सौ. स्नेहल आकाश तनपुरे ह्या उमेदवार असून त्यांचे चिन्ह पाण्याची घागर आहे. वॉर्ड क्रमांक एक मधून सुजाता जगन्नाथ तनपुरे यांचे चिन्ह इस्त्री आहे. तर वॉर्ड क्रमांक दोन मधून स्वत: इंजि. दिलीप तनपुरे हे उमेदवार असून त्यांचे चिन्ह फलंदाज आहे. 


सध्या निवडणुक प्रचारात सर्वसामान्य शेतकरी, कामगार विकास पॅनेलने आघाडी घेतली असून अगोदर एक उमेदवार बिनविरोध निवडून आला असल्याने थेट सरपंचपद व तीन उमेदवार हे आमचे विजयी होवून कानकात्रेवाडी ग्रामपंचायतीवर सर्वसामान्य शेतकरी, कामगार विकास पॅनेलची सत्ता येणार असल्याचे प्रतिपादन थेट सरपंचपदाचे उमेदवार इंजि. दिलीप तनपुरे यांनी व्यक्त केले.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies