Type Here to Get Search Results !

सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाची कार्यकारिणी लवकरच रद्द करणेत येणार : पोपटराव सूर्यवंशी



माणदेश एक्सप्रेस न्यूज : आटपाडी : प्रत्येक तालुक्यातील कार्यकारिणी आणि कार्यकर्ते जिल्हा संघाविषयी नाराजी व्यक्त करत आहेत. या सर्व घटना गंभीर आहेत. संघटनेची प्रतिमा मलीन होत आहे. यामुळे संघटनेच्या कार्यपद्धती बाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या सर्व बाबींची तक्रार संभाजीराव तात्या तसेच राज्य संघाकडे मांडलेली आहे. तेव्हा या सर्व बाबींची दखल घेऊन येणाऱ्या ५ ते ६ दिवसामध्ये सर्व जिल्हा कार्यकारिणीचे राजीनामे घेणेत येणार आहेत.तसेच नवीन कार्यकारिणी महिन्याभरात निवडली जाणार असल्याची माहिती संघटनेचे नेते पोपटराव सूर्यवंशी यांनी दिली.


पुढे बोलताना ते म्हणाले, महाराष्ट्रातील तमाम प्राथमिक शिक्षकांच्या प्रशांसाठी अखंडपणे झटणारे संभाजीराव थोरात तात्या यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण राज्यभर शिक्षक संघ कार्यरत आहे. सांगली जिल्ह्यात सुरुवातीला विश्र्वास पुजारी यांनी या संघटनेच्या माध्यमातून कार्य केले. तात्यांचा कार्यपद्धतीवरती विश्र्वास ठेवत अनेक शिक्षक बंधू भगिनी या संघटनेत सहभागी झाल्या. आणि सांगली जिल्ह्यात बलाढ्य संघटन निर्माण झाले.


पुढे संघटनेची सत्ता बँकेत आली. बँकेत अर्थकारणाच्या नादात जिल्हा कार्यकारिणीने इतरांना विश्वासात घेणे बंद केले आहे. इतर पदाधिकाऱ्यांना तंबी देणे, हकालपट्टीची भीती घालणे, वरिष्ठांचा अपमान करणे, बँकेत गैरव्यवहार असे अनेक प्रकार बाहेर येत आहेत. तसेच इतर संघटनेतून निवडणुकीच्या तोंडावर संघामध्ये स्वार्थासाठी आलेल्या संचालकांचे उर्मट वागणे, नेतृत्वाबदल अपशब्द वापरणे, बँकेत लोकांना वेठीस धरणे अशा अनेक तक्रारी अलीकडे सांगली जिल्ह्यातून  राज्य संघाकडे आल्या आहेत.


प्रत्येक तालुक्यातील कार्यकारिणी आणि कार्यकर्ते जिल्हा संघाविषयी नाराजी व्यक्त करत आहेत. या सर्व घटना गंभीर आहेत. संघटनेची प्रतिमा मलीन होत आहे. यामुळे संघटनेच्या कार्यपद्धती बाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या सर्व बाबींची तक्रार संभाजीराव तात्या तसेच राज्य संघाकडे मांडलेली आहे. तेव्हा या सर्व बाबींची दखल घेऊन येणाऱ्या ५ ते ६ दिवसामध्ये सर्व जिल्हा कार्यकारिणीचे राजीनामे घेणेत येणार आहेत.तसेच नवीन कार्यकारिणी महिन्याभरात निवडली जाईल.


संघांमध्ये नवीन शिलेदारांना संधी देऊन संघटन आणखी मजबूत होईल.तसेच तात्यांच्या सततच्या तत्परतेने अनेक बांधव संघामध्ये प्रवेश करण्यास इच्छुक आहेत. शिक्षकांचे प्रश्न दिवसेंदवस गंभीर होत आहे. शिक्षकांच्या प्रश्नावरती आवाज उठवण्याचे काम संघाने सातत्याने ठेवले आहे. इथून पुढेही शिक्षक संघच शिक्षकांसाठी झटत राहील. आपली चिंता वाढेल. 


🪀 WhatsApp वर न्यूज/जॉब्स/माहिती-मनोरंजन 'माणदेश एक्सप्रेस' Free जॉईन करा, त्यासाठी क्लिक करा 



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies