तुम्ही नेहमी ऐकले असेल की, आपल्या मुलांसाठी आणि त्यांच्या आंनदासाठी आई-वडील काहीही करू शकतात. पण एखाद्या पालकांवर आपल्या मुलाला विकण्याची वेळ येत असेल तर यापेक्षा वाईट काय असू शकते? उत्तर प्रदेशच्या अलीगढमध्ये धक्कादायक प्रकार समोल आला आहे.
अलीगढमध्ये वसुली करणाऱ्यांच्या त्रासाला कंटाळून एका वडिलांवर आपल्या मुलाची विक्री करण्याची वेळ आली आहे. आपल्या ११ वर्षाच्या मुलाला भरचौकात विक्री करताना एक व्यक्ती दिसत आहे. पत्नी आणि मुलगा आणि मुलीसह गांधी पार्क बस स्टँडवर भर चौकात बसलेले आहेत. त्यांनी आपल्या गळ्यामध्ये एक पोस्टर लटकवले आहे. “माझा मुलगा विक्रीसाठी उपलब्ध आहे, मला मुलाला विकायचे आहे. मुलांची किंमीत सहा ते आठ लाख रुपये लावली आहे.
महुआखेडा क्षेत्रातील असदपुर कयाम परिससरातील हे प्रकरण आहे. पीडित व्यक्तीने काही महिन्यांपूर्वी एक जमीन खरेदी केली होती ज्यासाठी त्यांनी एका व्यक्तीकडून काही पैसे उधार घेतले होते.पीडित व्यक्तीचे म्हणणे आहे की, कर्ज दिल्याच्या काही दिवसांनंतर त्याने त्रास देण्यास सुरुवात केली. त्यांनी कर्जाच्या पैशांच्या वसुली करण्यासाठी जमीनीचे कागज घेतेले आणि बँकेकडे घाण ठेवून त्यावर कर्ज घेतले.
मुलाची विक्री करत असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी या व्यक्तीला पोलिस ठाण्यात घेऊन आले. तेव्हा त्या पीडित व्यक्तीने आपल्या नातेवाईकाकडून ५० हजार रुपयांचे कर्ज घेतल्याचे सांगितले जो तो फेडू शकला नाही. त्यानंतर पोलिसांनी कर्ज देणाऱ्या आणि घेणाऱ्या दोघांनाही समजावले. पीडित व्यक्तीने सांगितले की, तो हळू हळू पैसे परत देईल ज्यानंतर दोघांमधील प्रकरण शांतते सोडविण्यात आले.