Type Here to Get Search Results !

मराठा आरक्षणप्रश्नी शरद पवारांच्यावर तोंडसुख घेणाऱ्याच्या तोंडाला काळ फासल



माणदेश एक्सप्रेस न्युज : पुणे : मराठा आरक्षणप्रश्नी शरद पवारांच्यावर तोंडसुख घेणाऱ्या व स्वत:ला माँ साहेब जिजाऊ यांचा वंशज समजणाऱ्या नामदेव जाधव याच्या तोंडाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी काळे फासले आहे. 


पुण्यातील येरवडा परिसरातील भांडारकर संस्थेच्या औकार्यक्रमासाठी नामदेव जाधव पोहचले होते. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केला. त्यामुळे नामदेव जाधवांचा कार्यक्रम रद्द करण्यात आला.  


राज्यात सध्या मराठा विरुद्ध ओबीसी असा वाद सुरु आहे. त्यातच प्रा. नामदेव जाधव यांनी शरद पवार यांचा ओबीसी असा उल्लेख केला होता. त्यानंतर राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. नामदेव जाधव यांनी माध्यमांसमोर एक पत्र सादर करुन शरद पवार ओबीसी असल्याचा दावा केला होता. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी देखील नामदेव जाधवांना चांगलचं सुनावलं होतं


शरद पवारांविरोधात टीका करणाऱ्या नामदेव जाधवांविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे कार्यकर्ते पुण्यात आक्रमक झाले. दरम्यान यावेळी कार्यकर्त्यांना मोठ्या प्रमाणावर घोषणाबाजी देखील केली. नामदेव जाधव यांच्याविरोधात खंडणी घेतल्याचा आरोप करण्यात आला असून, अशा व्यक्तीने शरद पवारांविरोधात टीका करणं चुकीचं असल्याचं कार्यकर्त्यांनी म्हटलं आहे. त्याचप्रमाणे नामदेव जाधव करत असलेले आरोप हे पूर्णपणे चुकीचे असल्याचं देखील कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे.




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies