Type Here to Get Search Results !

राष्टवादीच्या 'या' नेत्यानं घेतली नामदेवराव जाधवांना काळं फासल्याची जबाबदारी



माणदेश एक्सप्रेस न्युज : पुणे : शरद पवार यांच्या मराठा आरक्षणा संदर्भात सातत्याने टीका करणाऱ्या  नामदेव जाधव वर झालेल्या शाई फेक हल्याची जबाबदारी राष्ट्रवादी कॉंग्रेसने स्वीकारली आहे. याबाबत राष्ट्रवादीचे पुणे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप यांनी याबाबत सविस्तर माहिती दिली आहे.


पुणे येथे आज शनिवारी नामदेव जाधव यांच्या भांडारकर इन्स्टिट्यूटमध्ये कार्यक्रम होणार होता.पण इन्स्टिट्यूटने या कार्यक्रमाला परवानगी नाकारली होती.कायदा आणि सुव्यवस्थेचं कारण देत कार्यक्रमाला परवानगी नाकारण्यात आली होती.त्यानंतर नामदेव जाधव प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देण्यासाठी पत्रकार भवनासमोर आले होते.पण याचवेळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्यावर काळं फासल्याचा प्रकार घडला.


राष्ट्रवादीचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी या आंदोलनाची जबाबदारी स्वीकारली आहे.ते म्हणाले, आम्ही आजच्या या आंदोलनाची जबादारी स्वीकारत आहोत.होय,आम्ही नामदेवराव जाधव यांना काळं फासलं.या जाधवांना विक्रोळी पोलिसांनी खंडणीच्या गुन्ह्याखाली अटक केली होती.एका शाळेत पैसे घेऊन मुलांचे मार्क्स वाढवल्याप्रकरणी त्यांची हकालपट्टी करण्यात आली होती.आणि आज तेच शरद पवार यांच्यावर टीका करत असल्याचे जगताप म्हणाले.


जगताप म्हणाले, लोकशाहीमध्ये टीका करण्याचा अधिकार आहे. पण तो खऱ्या पुराव्यावर करावी. शरद पवार महाराष्ट्राच्या राजकारणात 60 वर्षांपासून जास्त कालावधीपासून आहेत. ते त्यांच्यावर नाहक खोटे आरोप केले जातात.हे आरोप होत असताना पुरावे सादर केले जात नव्हते.पुरावे असते तर निश्चित टीका करावी.आम्ही आठ दिवसांचा कालावधी दिला होता.आम्ही त्यांना इशारा देऊनही ती भाषा थांबवली नाही. त्यामुळे आम्ही त्यांच्या तोंडाला काळं फासवलं अशी प्रतिक्रिया प्रशांत जगताप यांनी दिली.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies