Type Here to Get Search Results !

डेंग्यू आजाराचा प्रादुर्भाव वाढतोय झपाट्याने; चार महिन्यांत रुग्णाची संख्या अधिक...

 

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरामध्ये गेल्या चार महिन्यांत डेंग्यूचे २२९ रुग्ण आढळले आहेत. त्यातील ऑक्टोबरमध्ये ८१ जणांना डेंग्यूची लागण झाली असून, गेल्या चार महिन्यांत ऑक्टोबरमधील रुग्णवाढ अधिक आहे.

शहरात जूनमध्ये एकही डेंग्यूचा रुग्ण आढळला नाही. मात्र, गेल्या चार महिन्यांत नऊ हजार ४४४ संशयित रुग्णांची तपासणी केल्यानंतर २२९ डेंग्यूचे रुग्ण आढळले आहेत. त्यात जुलैमध्ये एक हजार ४३२ संशयित रुग्णांची तपासणी केल्यानंतर ३६, ऑगस्टमध्ये दोन हजार १४५ रुग्णांची तपासणी केली.

असता ५२, सप्टेंबरमध्ये दोन हजार ३२७ रुग्णांची तपासणी केल्यानंतर ६०, तर ऑक्टोबरमध्ये दोन हजार ४३८ संशयित रुग्णांची तपासणी केल्यानंतर तब्बल ८१ जणांना डेंग्यूची लागण झाल्याचे समोर आले.

पावसाळ्यात पाणी साचून राहून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. त्यामुळे सर्वसाधारणपणे पावसाळ्यात डेंग्यूच्या रुग्णांमध्ये वाढ होते. आता पाऊस संपला असताना डेंग्यूच्या रुग्णांची संख्याही कमी होण्याची शक्यता वैद्यकीय विभागाने व्यक्त केली.


إرسال تعليق

0 تعليقات
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies