Type Here to Get Search Results !

आजचे राशीभविष्य, २२ नोव्हेंबर २०२३ : वाचा, कसा असेल तुमचा आजचा दिवस?



मेष- आज आपणास खूप मोठा आर्थिक लाभ होईल. सामाजिक स्तरावर यश व कीर्ती वाढेल. व्यापारात लाभ होईल. विवाहाची बोलणी करण्याच्या दृष्टीने विवाहेच्छुकांना यश मिळेल. दुपार नंतर मात्र प्रकृती बिघडू शकते.


वृषभ - आज सर्व प्रकारच्या मानसिक तणावापासून मुक्तता मिळू शकेल. प्रकृती उत्तम राहील. कौटुंबिक जीवनात सुख- समाधान लाभेल. व्यापार - व्यवसायात यश मिळवू शकाल. 


मिथुन- आजचा दिवस मिश्र फलदायी आहे. प्रकृतीत चढ-उतार येतील. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठ आपल्या कामगिरीवर नाखूष झाल्याने आपणास मानसिक त्रास होईल. खर्च वाढेल. संततीची काळजी राहील. दुपार नंतर कार्यातील यश दृष्टिक्षेपात आल्याने मनाला आनंद वाटेल.  


कर्क- आज मन अशांत व निरुत्साही राहील. रागावर नियंत्रण ठेवावे लागेल. अवैध कृत्ये व नकारात्मक विचारां पासून दूर राहावे लागेल. पैशांची चणचण भासेल. दुपार नंतर मात्र प्रकृती चांगली राहिल्याने मनःस्वास्थ्य मिळेल. 


सिंह- आज आपणास मनोरंजनाची अनेक साधने उपलब्ध होतील. मित्र व स्नेहीजनांसह आनंद लुटाल. सहलीस जाऊ शकाल. दुपार नंतर मात्र अती विचार केल्यामुळे मानसिक थकवा जाणवेल. 


कन्या - आजचा दिवस शुभ फलदायी आहे. कार्यात यश मिळाल्याने खुश राहाल. यश व प्रसिद्धी वाढेल. कौटुंबिक वातावरण अनुकूल राहील. त्यामुळे शारीरिक व मानसिक दृष्टया आपण तरतरीत व प्रफुल्लित राहाल. 


तूळ- लेखनकार्य करण्यास आजचा दिवस शुभ आहे. बौद्धिक चर्चेतून लाभ संभवतात. कीर्ती वाढेल. आज जास्त भावनावश व्हाल. कामाच्या ठिकाणी वातावरण अनुकूल राहील. सहकार्यांचे अपेक्षित सहकार्य मिळेल.  


वृश्चिक- आज आपण भावनेच्या आहारी जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे मानसिक ताण वाढेल. आर्थिक नियोजन यशस्वीपणे करू शकाल. वैभवी वस्त्र, दागीने व सौंदर्य प्रसाधने यांवर खर्च होईल. माते कडून लाभ होईल. 


धनु- आज मन उत्साहित राहील. कुटुंबीयांसह कौटुंबिक प्रश्नांवर चर्चा होईल त्यातून योग्य निर्णय घेऊ शकाल. मित्रांशी संबंध वाढतील व प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल. नशिबाची साथ मिळेल. 


मकर- आज मन उत्साहित राहील. कुटुंबीयांसह कौटुंबिक प्रश्नांवर चर्चा होईल त्यातून योग्य निर्णय घेऊ शकाल. मित्रांशी संबंध वाढतील व प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल. नशिबाची साथ मिळेल. दुपार नंतर मात्र आपण अधिक संवेदनशील व्हाल. मानसिक ताण राहील. 


कुंभ-  आज प्रापंचिक गोष्टीं ऐवजी गूढ विषयांकडे आपला जास्त कल होईल. नकारात्मक विचार काढून मानसिक स्वास्थ्य मिळविण्याचा प्रयत्न करा. शारीरिक उत्साह व मानसिक प्रसन्नता दिवसभर राहील. दुपार नंतर एखाद्या धार्मिक कार्याकडे आकर्षित व्हाल. 


मीन- आज आर्थिक देवाण- घेवाण, वसुली, थकबाकी इत्यादी कार्यात व गुंतवणूक करताना सावध राहावे लागेल. इतरांच्या कामांत व्यत्यय आणू नका. कोर्ट- कचेरी प्रकरणात सावध राहावे लागेल. वाणी व संतापावर नियंत्रण ठेवावे लागेल. 


(टीप : यातून माणदेश एक्सप्रेस कोणताही दावा करत नाही, फक्त महिती पोचविणे हा उद्देश)


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies