Type Here to Get Search Results !

चोरट्याने धूम स्टाईलने महिलेचे गंठन केले लंपास चोरी, झटापटीत महिला जखमी



माणदेश एक्सप्रेस न्यूज 

सांगली : रस्त्यावरुन पायी जाणाऱ्या महिलेस मारहाण करुन चोरट्याने तिच्या गळ्यातील तीस हजार रुपयांचे गंठन लंपास केले. यावेळी संबंधित महिलेने चोरट्याचा हाताचा चावा घेतला. दरम्यान झालेल्या झटापटीत गंठन हिसकावून चोरट्याने पळ काढला. या झटापटीत महिला जखमी झाली. ही घटना सांगली-कोल्हापूर रस्त्यानजीक असणाऱ्या खिलारे मंगल कार्यालयानजीक घडली. याप्रकरणी सांगली शहर पोलीस ठाण्यात सारिका शिवाजी शिंदे (रा. समर्थ कॉलनी, शामरावनगर, सांगली ) यांनी फिर्याद दिली आहे. 

फिर्यादी सारिका शिंदे या घरातून फिरण्यास बाहेर पडल्या होत्या. त्या मंगल कार्यालयानजीक आल्या असता एक दुचाकीस्वार त्यांच्या मागे आला आणि त्याने सारिका शिंदे यांना धक्का दिला. यामध्ये त्या खाली पडल्या. तेवढ्यात संशयीताने त्यांच्या गळ्यातील गंठन हिसका मारुन ओढण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी सारिका शिंदे यांनी संशयीताच्या हाताचा चावा घेतला. 


यावेळी झालेल्या झटापटीत संशयिताने फिर्यादी शिंदे यांच्या तोंडावर जोरात बुक्की मारली आणि गंठन हिसकावून घेतले. परंतु गंठन तुटल्याने त्याच्या हाती सोन्याच्या दोन वाट्या तसेच चार मणी आले. ते घेवून संशयीताचे पलायन केले. जखमी अवस्थेत देखील शिंदे यांनी आरडाओरडा केला परंतु तोपर्यत संशयीत दुचाकीवरुन पसार झाला होता. पोलिसांनी चोरट्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies