Type Here to Get Search Results !

Gopichand Padalkar : चप्पलफेक प्रकरणानंतर गोपीचंद पडळकर यांची प्रतिक्रिया म्हणाले, आमची मेंढरंसुद्धा जंगलात वाघाला न भिता जातात...



माणदेश एक्सप्रेस न्युज : इंदापूर : पुणे जिल्ह्यातील इंदापूरमध्ये ओबीसी समाजाची एल्गार सभा पार पडली. या सभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे अन्न-नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ, भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्यासह अनेक ओबीसी नेत्यांनी आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटलांवर सडकून टीका केली आहे.


ही सभा आटोपल्यानंतर एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सभेनंतर गोपीचंद पडळकर यांच्यावर चप्पलफेक करण्यात आल्याची घटना घडली आहे. या चप्पलफेकीनंतर ओबीसी समाजही आक्रमक झाला असून पुणे- सोलापूर महामार्ग रास्ता रोको आंदोलन करण्यात आले आहे.


भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर शनिवारी इंदापुरात चप्पलफेक करण्यात आली आहे. ही चप्पलफेक पडळकरांनी मराठा आरक्षणाविरोधात आक्रमक भूमिका घेतल्यामुळेच करण्यात आल्याचा आरोप केला जात आहे. तर स्थानिक मराठा आंदोलकांनी हा आरोप फेटाळून लावत आम्ही फक्त त्यांना उपोषणस्थळी येण्यापासून रोखलं होतं असं म्हटलं आहे. तसेच त्यांच्याच कार्यकर्त्यांचं हे कृत्य असल्याचेही या मराठा आंदोलकांचं म्हणणं आहे.


चप्पलफेक प्रकरणानंतर गोपीचंद पडळकर यांची प्रतिक्रिया

माझ्या माघारी मी आल्यावर त्या ठिकाणी व्हिडीओ केला असेल तर तो मला माहित नाही, हा भेकड पणा आहे, आमची मेंढर बरी,  जंगलात सुद्धा वाघाला न भिता जातात. तुम्हाला जर असा काही प्रयोग करायचं असेल तुम्ही मला सांगा, ठिकाण सांगा मी तिथे येथे परंतु असल्या कुठल्याची चुकीच्या पद्धतीने भेकडपणा करू नका. 


व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा





إرسال تعليق

0 تعليقات
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies