Type Here to Get Search Results !

आटपाडी : दिघंचीचे बाळासाहेब होनराव यांनी निवड



माणदेश एक्सप्रेस न्युज : आटपाडी/प्रतिनिधी : आटपाडी तालुक्यातील दिघंची ग्रामपंचायतीचे सदस्य नितीन उर्फ बाळासाहेब होनराव यांनी संजय गांधी निराधार योजनेच्या अध्यक्षपदी जिल्हाधिकारी डॉ.राजा दयानिधी यांनी निवड केली आहे.


आटपाडी तहसीलदार कार्यालयामध्ये वृद्ध व निराधार लोकांना सहाय्य करण्यासाठी शासनाच्या वतीने संजय गांधी निराधार योजना समिती आहे. या योजने अंर्तगत निराधार लोकांना अनुदान मिळवून देण्यासाठी समिती स्थापन करण्यात येते. या समितीच्या अध्यक्षपदी व समितीची निवड जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी केली आहे.


यामध्ये समितीच्या अध्यक्षपदी नितीन उर्फ बाळासाहेब होनराव तर सदस्यपदी दिघंचीचे संजय वाघमारे, करगणीचे रमेश माने, खरसुंडी येथील विनोद पुजारी, सचिन मोटे रामदास सूर्यवंशी, सलीम शेख यांची निवड करण्यात आली आहे.


बाळासाहेब होनराव हे आमदार अनिल भाऊ बाबर यांचे समर्थक असून जिल्हा बँकेचे संचालक तानाजीराव पाटील यांचे सहकारी आहेत. निवडीनंतर या पदाचा उपयोग तालुक्यातील निराधार व तळागाळातील लोकांना न्याय देण्यासाठी करणार असल्याचे होनराव म्हणाले. 



إرسال تعليق

0 تعليقات
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies