मुंबई: पालघर तालुक्यातील कुडण गावात आठ वर्षांच्या मुलावर बिबट्याने हल्ला करून जखमी केले आहे. प्रेम जितेंद्र पाटील असे जखमी मुलाचे नाव आहे.
त्याला सिल्वासा येथील विनोबा भावे सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, वनविभागाने कुडण परिसरात बिबट्याचा शोध सुरू केला आहे.
प्रेम याच्या चेहरा आणि डोक्यावर गंभीर जखमा झाल्या आहेत. त्याची प्रकृती स्थिर असल्याचे समजते. प्रथम प्रेम याच्यावर कुत्र्याने हल्ला केल्याचा अंदाज वर्तवण्यात येत होता. मात्र, वैद्यकीय अहवालानंतर बिबट्याने हल्ला केल्याचा संशय व्य क्त करण्यात येत आहे, असे ग्रामस्थ सरपंच यांनी सांगितले.