Type Here to Get Search Results !

धक्कादायक घटना : बॉयफ्रेंडपासून वय लपवण्यासाठी 41 वर्षीय महिलेने केलं असं काही; ज्यामध्ये ती स्वतःच अडकली...



एक महिला तिच्या बॉयफ्रेंडपेक्षा 17 वर्षाने मोठी आहे. तिचं वय 41 तर बॉयफ्रेंडचं वय 24 वर्षे आहे. तिने बॉयफ्रेंडपासून आपलं वय लपवण्यासाठी असं काही केलं की, ती स्वत: फसली. महिलेला तिच वय लपवायचं होतं म्हणून तिने नकली पासपोर्ट बनवण्याचा आधार घेतला.


ही घटना चीनच्या बीजिंगमधील आहे. महिलेचा जन्म 1982 मध्ये झाला होता. तिच्यावर इमिग्रेशन अधिकाऱ्याला संशय आला. त्यांना पासपोर्टमध्ये काहीतरी गडबड दिसली. जेव्हा महिलेची कागदपत्रे चेक केली जात होती तेव्हा ती घाबरली होती.


साऊथ चायना मॉर्निंग पोस्टच्या रिपोर्टनुसार, तिने तिचा पासपोर्ट मागे खेचला जेणेकरून अधिकारी तो चेक करू नये. ती अधिकाऱ्याला म्हणाली की, बाजूला येऊन बोलू. तर बॉयफ्रेंडला म्हणाला की, चेक पॉइंटकडे जा. पुढे चौकशीतून समोर आलं की, तिच्याकडे वेगवेगळ्या जन्मतारखेचे दोन चीनी पासपोर्ट आहेत. अधिकाऱ्यांना समजलं की, यातील एक पासपोर्ट नकली आहे. यात खाजगीमध्ये बदल करण्यात आला आहे. 


या महिलेला भिती होती की, तिचं खरं वय माहीत पडल्यावर तिचं रिलेशनशिप संपेल. तिने जपानला जाण्यासाठी एक नकली पासपोर्ट बनवला. ज्यात जन्मतारीख 1996 टाकली होती. यासाठी तिने 6500 युआन म्हणजे 77 हजार रूपये खर्च केला. 


यासाठी या महिलेला 3 हजार युआन म्हणजे 35 हजार रूपये दंड ठोठावण्यात आला आहे. तिचा नकली पासपोर्ट जप्त करण्यात आला आहे. 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies