Type Here to Get Search Results !

आज सोनं स्वस्त की महाग? पाहा मुंबईसह तुमच्या शहरातील भाव

  



Gold-Silver Price Today: १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याची किंमत आज रुपये ६२,४६० असून मागील ट्रेडमध्ये ह्या मौल्यवान धातूची किंमत ६२,३२० रुपये प्रति १० ग्रॅमवर बंद झाली होती. बुलियन मार्केट या वेबसाइटनुसार, चांदी ७४,६०० रुपये प्रति किलोने विकली जात आहे. मागील ट्रेडमध्ये चांदीची किंमत ७५,३५० रुपये प्रतिकिलो होती. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किमती भारतभर बदलतात.


बुलियन मार्केट वेबसाईटनुसार, मुंबईमध्ये २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ५७,१५४ रुपये आहे. मुंबईत २४ कॅरेट सोन्याची किंमत ६२,३५० प्रति १० ग्रॅम आहे. पुण्यात प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ५७,१५४ असेल तर २४ कॅरेट सोन्याचा दर ६२,३५० रुपये असेल. नागपूर मध्ये प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ५७,१५४ तर २४ कॅरेट सोन्याचा दर ६२,३५० रुपये इतका असेल. नाशिकमध्ये २२ कॅरेट सोन्याचा दर ५७,१५४ आहे तर प्रति १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचा दर ६२,३५० रुपये आहे.



सोन्याची शुद्धता तपासण्यासाठी एक अॅिप बनवण्यात आले आहे. ‘BIS Care app’ या अॅ पच्या माध्यमातून ग्राहक सोन्याची शुद्धता तपासू शकतात. तसेच या अॅलपच्या मदतीने आपण फक्त सोन्याची शुद्धताच तपासू शकत नाही तर यासंबंधित तक्रारीसुद्धा नोंदवू शकतो. वस्तूंचा परवाना, नोंदणी आणि हॉलमार्क क्रमांक चुकीचा असल्याचे आढळल्यास, ग्राहक या अॅ्पमधून लगेच त्याबद्दल तक्रार करू शकतात. या अॅोपच्या माध्यमातून ग्राहकाला तक्रार नोंदविण्याबाबतची माहितीही तत्काळ मिळणार आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies