Type Here to Get Search Results !

पाण्याचा अंदाज न आल्याने युवकाचा बुडून मृत्यू

 


तळेगाव स्टेशन येथील तळ्यात पोहण्यासाठी उतरलेल्या युवकाचा पाण्याचा अंदाज न आल्याने बुडून मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना मंगळवारी (दि.५) सायंकाळी घडली. आरमान अंकीलूर रहिमान खान (वय १८, रा. कमलारमण नगर, बैगनवाडी गोवंडी, मुंबई) असे पाण्यात बुडून मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे. 

 

तळेगाव दाभाडे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी सायंकाळी साडेपाच ते सहाच्या सुमारास तळेगाव स्टेशन येथील एमएसईबी कार्यालयाजवळील तळ्यामध्ये पोहण्याकरता काही युवक पाण्यात उतरले. 


यावेळी पाण्याचा अंदाज न आल्याने आरमान अंकीलुर रहिमान खान पाण्यात बुडाला. त्यास तळेगाव दाभाडे नगरपरिषद अग्निशमन दल, तळेगाव दाभाडे पोलिस व वन्यजीव रक्षक मावळ संस्था आपदा मित्र मावळ, पुणे तसेच स्थानिक नागरिकांच्या मदतीने बाहेर काढण्यात आले.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies